अभिनेत्री शहनाज गिल सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. ‘बिग बॉस’मधून प्रसिद्धी मिळविलेल्या शहनाजने नुकतीच फिल्मफेअर मिडल ईस्ट अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील सिद्धार्थ शुक्लाबद्दल बोलतनाचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता शहनाजचा आणखी एक व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहनाजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सिंहाला बघण्यासाठी उत्सुक असलेली शहनाज थोडीशी घाबरलेली, आरडाओरडा करताना दिसत आहे. सुरुवातीला रुममध्ये जाण्यासाठी शहनाज तयार होत नसल्याचं दिसत आहे. रुमचा दरवाजा उघडताच शहनाज “ओय मम्माजी” असं काहीतरी पुटपुटत दूर पळत आहे. नंतर शहनाज रुममध्ये येते सिंहाच्या बछड्याला बघितल्यानंतर “वाहेगुरू” असं म्हणत पुन्हा तिथून पळून गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. शेहनाजने तिचा हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत त्याला “मी तर घाबरुन गेले” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा >> Drishyam 2: ‘दृश्यम २’ लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; हॉटस्टार, नेटफ्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राईम? जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार

हेही वाचा >> “मी लग्न करू की नको?” चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं भन्नाट उत्तर, म्हणाली, “करून टाका माझा…”

शेहनाजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत “तू आमची शेरनी आहेस. घाबरू नकोस”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “सिंहाचं बछडंही तुझ्यावर फिदा होईल, एवढी तू क्यूट आहेस. घाबरू नकोस”, अशी कमेंट केली आहे.