बॉलिवूड अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि अभिनेता फरहान अख्तर फेब्रुवारी महिन्यात विवाहबंधनात अडकले. लग्नानंतरचा त्यांचा हा पहिलाच करवा चौथचा सण होता. करवा चौथच्या दिवशी शिबानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट केला होता.

शिबानीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने डिझायनर मंगळसूत्र परिधान केलं होतं. ‘बुल्गारी’ ब्रॅण्डचे प्रमोशन करण्यासाठी तिने मंगळसूत्र घातलेला फोटो पोस्ट केला होता. “‘बुल्गारी’ मंगळसूत्रामुळे माझा पहिलाच करवा चौथ सण कायमच लक्षात राहील. मी करवा चौथसाठी उपवास केला नव्हता. पण, फरहानबद्दल असलेलं हे प्रेम सगळं काही सांगून जातं”, असं तिने कॅप्शनमध्ये लिहलं होतं.

हेही वाचा >> ‘आय लव्ह यू’ म्हणतानाच्या व्हायरल व्हिडीओवर उर्वशी रौतेलाचं स्पष्टीकरण, म्हणाली “तो व्हिडीओ…”

हेही वाचा >> “हा मुलगा कोण?”, ‘मनमर्जिया’च्या ट्रेलरमध्ये विकी कौशलला पाहून कतरिनाला पडला होता प्रश्न

शिबानीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. “ही पोस्ट फक्त व्यावसायिक प्रमोशनकरिता केलेलं आहे”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलं आहे. तर दुसऱ्याने “करवा चौथ फक्त नावाकरिता आहे. ही पोस्ट व्यावसायिक प्रमोशनकरिता केली आहे. तुमचा जर त्यावर विश्वास नसेल, तर कृपया फक्त ब्रॅण्डिंगसाठी त्याचा वापर करू नका. यामुळे तुम्ही संस्कृतीचा अनादर करत आहात”, असं म्हटलं आहे.

हेही पाहा >> Photos : आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं पाऊट

शिबानी आणि फरहान बॉलिवूडमधील चर्चेतल्या जोडींपैकी एक आहेत. ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती फरहान अख्तरबरोबरचे फोटोही पोस्ट करत असते.

Story img Loader