९० च्या दशकात अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचा नवरा राज कुंद्रा हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. १९ जुलै २०२१ रोजी त्याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता लवकरच राज कुंद्रावर एक चित्रपट येणार असून त्याचे नाव ‘UT69’ असं आहे.

हेही वाचा : अभिनेत्री जुई गडकरीला चिडवतात ‘गाववाली’? का ते जाणून घ्या..

पॉर्नोग्राफी प्रकरणात नाव आल्यापासून राज कुंद्रा सतत मास्क घालून बाहेर फिरत असतो. मास्कशिवाय तो कधीच फिरत नाही त्याचा चेहरा नेहमी मास्कने झाकलेला असतो. या मास्कमध्ये त्याचा चेहरा अजिबात दिसत नाही. गेल्या दोन वर्षांपासून सतत मास्क घालून फिरत असल्याने त्याच्यावर अनेक लोक टीका करतात. शिल्पा शेट्टी आणि त्याच्या मुलांबरोबर फिरतानादेखील तो मास्क घालत असल्याचं पाहायला मिळतं.

हेही वाचा : “नाचणीची भाकरी, मच्छी फ्राय अन्…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने चुलीवर बनवलं जेवण, व्हिडीओ शेअर करत म्हणाली

आता नुकताच कुंद्रा दाम्पत्याचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पती राज कुंद्राच्या जोडीने चक्क शिल्पा शेट्टीने सुद्धा चेहऱ्यावर मास्क लावल्याचं दिसत आहे. नवऱ्याप्रमाणे काळ्या रंगाचा मास्क शिल्पाने घातला होता.

हेही वाचा : ‘अंकुश’ चित्रपटामुळे सोशल मीडियावर ट्रोल होणारा दिपराज घुले आहे तरी कोण?

shilpa shetty
शिल्पा शेट्टी ट्रोल

शिल्पा आणि राज कुंद्राचा हा व्हिडओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता आहे. पापाराझींनी मागणी केल्यावर शिल्पाने यात शेवटी तिचा चेहरा दाखवला. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “चुकीची कामं केल्यावर तोंड लपवण्याची वेळ येते”, “आता शिल्पा शेट्टी सुद्धा नवऱ्यासारखी वागतेय”, “आता दोघं मिळून चेहरा लपवत आहेत वाह काय जोडी आहे”, “यांच्या घरात मास्कसाठी वेगळा वॉर्डरोब असेल”, “नवऱ्याच्या चुकीच्या कृत्यांचं शिल्पा समर्थन करतेय”, अशा असंख्य कमेंट्स करत नेटकऱ्यांनी शिल्पा शेट्टीला ट्रोल केलं आहे.

shilpa
शिल्पा शेट्टी

दरम्यान, राज कुंद्रावर आधारित चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका राज कुंद्राच साकारणार आहे.

Story img Loader