अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सामील आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या मराठमोळ्या अंदाजासाठी नेहमीच ओळखली जाते. तिला मराठी संस्कृतीबद्दल खूप प्रेम आहे. अनेकदा ती आपल्याला स्पष्ट मराठीत बोलताना दिसते. तर आता तिचा असाच एक नवा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

श्रद्धा कपूरला मराठी संस्कृतीबद्दल, मराठी भाषेबद्दल नेहमीच गोडी वाटत आली आहे. बोलणं असो, वेशभूषा असो अथवा खाद्यपदार्थ; अनेकदा ती तिच्या कृतीतून तिला मराठी संस्कृतीबद्दल वाटणारं प्रेम दाखवत असते. आतापर्यंत अनेकदा तिच्या मराठी बोलण्याचं कौतुक केलं गेलं आहे. तर आता पुन्हा एकदा असंच काहीसं घडलं आहे.

dilip kumar
दिलीप कुमार झोपलेले असताना धर्मेंद्र त्यांच्या घरात घुसले होते; अभिनेते म्हणालेले, “मी घाबरत जिना उतरला अन्…”
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Nikhil Bane
“मी घाबरलो…”, निखिल बनेने सांगितला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील पहिल्या दिवसाचा अनुभव; म्हणाला, “गेट उघडताच…”
Khushi Kapoor
“माझा आत्मविश्वास…”, खुशी कपूरची तिच्या सौंदर्यावरून उडवली जात होती खिल्ली; किस्सा सांगत म्हणाली…
vidya balan distributes food and clothes to needy people video viral
Video: गरजूंना वाटले कपडे अन् वडापाव; बॉलीवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “माणुसकी अजून जिवंत आहे”
Komal More
“शत्रूला पोत्यात भरून…”, ‘लाखात एक आमचा दादा’मधील तेजूच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
govinda
“तू स्वत:च तर…”, गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता आहुजाने विचारलेले ‘हे’ प्रश्न; खुलासा करत म्हणाली, “मला भीती…”

आणखी वाचा : चाहत्याने श्रद्धा कपूरला मराठीतून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, कमेंट वाचताच अभिनेत्री म्हणाली…

श्रद्धा कपूर नुकतीच बोटीतून मुंबई बाहेर जाताना दिसली. त्यावेळी तिने पापाराझींशी मनमोकळा संवाद साधला. ती त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त करताना दिसली. ते म्हणजे त्यांच्यातलं हे सगळं संभाषण मराठीत झालं. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ती म्हणते, “तुम्हाला असं उलटं चालताना पाहून मला भीती वाटते.” त्यावर एक पापाराझी तिला म्हणतो, “आता आम्हाला सवय झाली.” त्यावर श्रद्धा म्हणते, “हो मला माहित आहे, पण इथे खडबडीत आहे म्हणून.” त्यानंतर ती सगळ्यांना बाय म्हणून बोटीत बसून निघून जाते.

हेही वाचा : श्रद्धा कपूरने सांगितलं उत्तम मराठी बोलता येण्यामागचं गुपित, म्हणाली, “कारण मी…”

तिच्या या व्हिडिओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत तिच्या साधेपणाचं, मराठी बोलण्याचं आणि प्रेमळ स्वभावाचं कौतुक करत आहेत.

Story img Loader