बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांची लेक श्रुती हसनही लोकप्रिय अभिनेत्री आहे. श्रुतीने २००९ साली लक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर गब्बर इज बॅक, रमैय्य वस्तावया, वेलकम बॅक, बहन होगी तेरी या चित्रपटांतही ती झळकली. नुकतंच श्रुतीने एका मुलाखतीत प्लासिक सर्जरीवर भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रुतीने मुलाखतीत तिने नाकाची सर्जरी केली असल्याचं खुलासा केला आहे. ती म्हणाली, “मी माझ्या नाकाची सर्जरी केली आहे. माझ्या नाकाला दुखापत झाल्यामुळे ते तुटलं होतं. माझ्या पहिल्या चित्रपटात मी त्याच नाकाने काम केलं आहे. माझा चेहरा रेखीव दिसण्यासाठी मी हे करू शकत नाही का? माझ्या चेहऱ्याबद्दल मला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. कदाचित भविष्यातही तरुण दिसण्यासाठी चेहऱ्यावर मी शस्रक्रिया करेन किंवा नाही”.

हेही वाचा >> ‘जबरा फॅन’, चाहत्याची एक रिक्वेस्ट अन् शाहरुख खानने बुक केल्या चक्क ५ स्टार हॉटेलमधील रुम

“मी एक उत्तम कलाकार आहे. परंतु, मी भारतीय व्यक्तींसारखी दिसत नाही, असंही अनेक जण मला म्हणाले आहेत. कित्येक प्रोजेक्टसाठी मला गावातील मुलीची भूमिका देण्यात आली आहे, यामुळे मी साशंक आहे”, असंही ती पुढे म्हणाली.

हेही वाचा >> “नैराश्याबद्दल बोलण्यासाठी मला कंपनीने पैसे…”, दीपिका पदुकोणने मानसिक आजाराबाबत केला खुलासा

श्रुतीने याआधीही तिने केलेल्या नाकाच्या सर्जरीबद्दल २०२० मध्ये खुलासा केला होता. “नाकाची सर्जरी करण्यासाठी मला कोणीही सांगितलेलं नव्हतं. तो सर्वस्वी मी घेतलेला निर्णय होता. मी चेहऱ्यासाठी फिलर्सची शस्रक्रियाही केली आहे”, असंही ती म्हणाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress shruti hassan talks about her nose surgery says yes i did kak