अभिनेत्री सोनम बाजवा हिने २०१३ साली ‘बेस्ट ऑफ लक’ या पंजाबी चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर चित्रपटसृष्टीत तीची लोकप्रियता वाढली. याचवर्षी या चित्रपटसृष्टीत तिला १० वर्षं पूर्ण झाली आहेत. यानिमित्त सोनमने एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या चित्रपटसृष्टीतील अनुभवांबद्दल खुलासा केला आहे. शिवाय तिला आजवर कोणत्या भूमिका मिळाल्या आणि तिला चित्रपटात किसिंग सीन द्यायची भीती वाटते यावारही भाष्य केलं आहे.

या मुलाखतीमध्ये सोनमला ‘हॅप्पी न्यू इयर’ या फराह खानच्या चित्रपटात दीपिका पदूकोणच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं हे स्पष्ट झालं. नंतर काही कारणास्तव तिच्याऐवजी ही भूमिका दीपिका पदूकोणला मिळाली. शिवाय २०१९ चा आयुष्मान खुरानाच्या ‘बाला’ आणि २०२० च्या ‘स्ट्रीट डान्सर ३डी’ या चित्रपटातही सोनमने छोटी भूमिका केली होती.

Aai Kuthe Kay Karte Fame Actress Kaumudi Walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई! मालिकेतील कलाकारांनी केलं केळवण, सुंदर सजावटीने वेधलं लक्ष
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
Savalyachi Janu Savali Fame Prapti Redkar Dance on angaaron song of pushpa 2 movie
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकरचा ‘पुष्पा २’मधील ‘अंगारो’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : आमिर खान पुन्हा चित्रपटात कधी दिसणार? प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेता म्हणाला, “जेव्हा माझी…”

नंतर मात्र सोनमने आपला मोर्चा पंजाबी चित्रपटसृष्टीकडे वळवला. याबरोबरच चित्रपटातील कीसिंग सीनबद्दल ‘फिल्म कंपॅनीयन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनम म्हणाली, “बॉलिवूडच्या चित्रपटांत काही गोष्टी करायला मी नकार दिला आहे कारण त्या गोष्टी पंजाबमधील माझ्या चाहत्यांनी पहिल्या तर त्यांना वाईट वाटू शकतं. यामुळेच मी चित्रपटात कीसिंग सीन द्यायला घाबरते कारण माझे चाहते आणि कुटुंबीय त्याकडे कसं बघतील याची मला चिंता वाटते. हा सीन त्या कथेची गरज आहे हे त्यांना कदाचित पटकन समजणार नाही त्यामुळे मी असे सीन्स देत नाही.”

सोनम बाजवा आता पंजाबी चित्रपट ‘कॅरी ऑन जट्टा ३’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण युकेमध्ये पार पडलं आहे. या चित्रपटात गीप्पी ग्रेवाल, गुरप्रीत घुग्गी, बिन्नू ढिल्लों, नासिर चिन्योती हे कलाकारही दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यांच्या ट्रेलर लॉंच सोहळ्याला बॉलिवूड अभिनेता आमिर खानने विशेष हजेरी लावली होती.

Story img Loader