बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर काही महिन्यांपूर्वीच आई झाली. २० ऑगस्ट २०२२ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. सोशल मीडीयावर पोस्ट शेअर करत सोनमने ही गोड बातमी चाहत्यांनी दिली होती. सोनमच्या बाळाचं बारसंही मोठ्या थाटामाटात पार पडत त्याचं ‘वायू’ असं नाव ठेवण्यात आलं होतं.
सोनमने काही दिवसांपूर्वीच वायूसाठी खास तयार करण्यात आलेल्या रुमचे फोटो शेअर केले होते. आता अभिनेत्रीने तिच्या बाळाची झलक पहिल्यांदाच व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना दाखविली आहे. सोनम कपूर व आनंद अहुजा बाळाला घेऊन फिरण्यासाठी गेले होते. याचा व्हिडीओ सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आनंद अहुजा गाडी चालवताना दिसत आहे. त्यानंतर वायूबरोबर फेरफटका मारत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
हेही वाचा >> झी मराठी वाहिनीची नवी मालिका; CM शिंदेंची भूमिका साकारलेला अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत
हेही वाचा >> “मी लग्न करू की नको?” चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं भन्नाट उत्तर, म्हणाली, “करून टाका माझा…”
सोनमने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वायूचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी व्हिडीओच्या थंबनेलवर सोनम व आनंद अहुजाचा वायूला किस करतानाचा फोटो लावण्यात आला आहे. यामध्ये वायूची झलक दिसत आहे. सोनमचे चाहतेही वायूला बघण्यासाठी फार उत्सुक होते. सोनमने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा >> ‘पॉवर रेंजर’ फेम जेसन डेव्हिड फ्रॅंकचं निधन, ४९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सोनम कपूर व आनंद अहुजाने २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये वायूचे आगमन झाले. प्रेग्नंन्सी दरम्यान केलेल्या फोटोशूटमुळेही सोनम बऱ्याचदा चर्चेत होती.