सोनम कपूर हिचे नाव बॉलीवूडमधील उत्कृष्ट आणि चतुरस्त्र अभिनेत्रींच्या यादीत घेतले असते. फॅशनमध्येही सोनम कपूरचा बोलबाला आहे. गेले काही महिने तिने प्रेगन्सीमुळे चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला आहे. २ महिन्यांपूर्वीच तिने तिच्या मुलाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव तिने ‘वायू’ असे ठेवल्याचेही तिने जाहीर केले. तसेच करवा चौथला स्तनपान करतानाचा एक व्हिडीओ शेअर करत तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता पुन्हा एकदा सोनम चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : “मी शांत होते पण…”; करण कुंद्राबरोबर रोमँटिक गाणे करणाऱ्या रिवा अरोराच्या आईने व्यक्त केला संताप

सोनम कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. सोनम कपूर बर्‍याच महिन्यांनी जिममध्ये गेली. त्यामुळे तिने जिममध्ये परतल्याचा आनंद व्यक्त केला आहे. सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खुप मन लावून जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. सोनम कपूरने हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “चला सुरुवात करूया.” तसेच कॅप्शनमध्ये तिने तिच्या जिम ट्रेनरचे आभारही मानले आहेत. सोनम कपूरला पुन्हा एकदा जिममध्ये पाहून तिचे चाहते खूप खुश झाले आहेत.

हेही वाचा : कपूर खानदानाच्या चार पिढ्या एकाच फोटोत; पाहा सोनम-आनंदच्या मुलाची पहिली झलक

सोनम कपूर बरेच महिन्यांनी जिममध्ये आली आहे. सोनम आणि आनंद आहुजाला २० ऑगस्टला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. प्रेग्नन्सीदरम्यान अभिनेत्री सोनम कपूर चर्चेत होती. सोनमच्या बेबी शॉवर आणि मॅटर्निटी फोटोशूटची बरीच चर्चा रंगली होती. तिच्या बाळाला पाहण्यासाठी चाहतेही आतुर होते. सोनमने वायुला जन्म दिल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पाडला होता.