सेलिब्रिटी आणि त्यांची लग्नं ही नेहमीच चर्चेचा विषय असतात. जवळपास सगळेच बॉलीवूड स्टार्स राजेशाही थाटात विवाहबंधनात अडकतात. आज अभिनेत्री सोनाली सेहगल बोहल्यावर चढली आहे. तिने तिचा बॉयफ्रेण्ड व्यावसायिक आशीष सजनानीशी लग्न केलं. पण आता त्यावरून तिला अनेकांनी ट्रोल केलं आहे.
आशीष सजनानीशी लग्न करताच त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. या फोटोंमध्ये सोनालीच्या नवऱ्याला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तो तिच्यापुढे खूप वयस्कर वाटतो, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्या दोघांना ट्रोल करायला सुरुवात केली.
सोनालीने तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या लग्नसोहळ्यात सोनालीने गुलाबी रंगाचा घागरा परिधान केला होता, तर आशीषने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती. हे फोटो बघताच तिला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या, पण अनेकांनी कमेंट्स करूत तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
का नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “ही सगळी त्याच्याकडे असणाऱ्या पैशांची कमाल आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “हे कोण काका बसलेत तिच्या बाजूला?” तर तिसरा म्हणाला, “हा तिचा नवरा कमी आणि वडीलच जास्त वाटतोय.” तर आणखी एकाने लिहिलं, “याला पाहून मला वाटलं की हिचे वडील कन्यादान करायला आले होते.” तर आणखी एक जण म्हणाला, “हे चांगलं आहे.. आधी तरुण मुलांना डेट करायचं आणि मग वयस्कर व्यक्तीशी लग्न करून भविष्य सुरक्षित करायचं.” आता या फोटोंमुळे ती चांगलीच चर्चेत आहे.