Sunny Leone : लोकप्रिय अभिनेत्री सनी लिओनीने पुन्हा लग्न केलं आहे. सनी व तिचा पती डॅनियल वेबर दोघांनी मालदीवमध्ये पुन्हा एकदा लग्न केलं असून त्याच्या लग्नाचे फोटो चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नात त्यांची तिन्ही मुलं उपस्थित होती. २०११ मध्ये या जोडप्याने लग्न केलं होतं, त्यानंतर आता त्यांनी मालदीवला व्हेकेशनसाठी गेल्यावर पुन्हा एकदा लग्न केलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सनी लिओनी आणि डॅनियल वेबरने २०११ मध्ये लग्न केले होते. १३ वर्षांनंतर दोघांनी पुन्हा लग्न केलं आहे. ३१ ऑक्टोबर रोजी मालदीवमध्ये एका खासगी समारंभात दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांना लग्नातील वचनं दिली. या विवाहसोहळ्यात या जोडप्याची तिन्ही मुलं निशा, नोओ आणि अशर सहभागी झाले होते. मात्र सनी आणि डॅनियलने अद्याप या लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीत.
ई टाइम्सने एका सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सनी व डॅनियलला खूप दिवसांपासून पुन्हा लग्न करायचं होतं. त्यांची मुलं निशा, नोआ आणि अशर हे लग्नाचं महत्त्व समजू शकतील इतके मोठे होईपर्यंत दोघांनी वाट पाहिली. मुलांना शाळेत सुट्ट्या असताना सनी व डॅनियल यांनी मालदीवमध्ये पुन्हा लग्न करायचं ठरवलं, जेणेकडून ते सर्वजण एकत्र वेळ घालवू शकतील.
हेही वाचा – आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “सनी व डॅनियलची इच्छा होती की त्यांच्या तिन्ही मुलांनी कुटुंब, प्रेम आणि एकता ही मूल्ये समजून घ्यावी. दोघांच्या मते, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लग्न करता तेव्हा तुम्ही फक्त एकमेकांना ओळखत असता, कारण तुम्ही दोघांनी एकत्र आयुष्यातील आव्हानांचा सामना केलेला नसतो. मात्र आता एकत्र अडचणींचा सामना केल्यानंतर आणि जोडपं म्हणून सुंदर क्षण एकत्र साजरे केल्यावर एकमेकांना लग्नातील वचनं पुन्हा देऊन ती निभावणं हे खूप अर्थपूर्ण आहे.”
हेही वाचा – माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आतून कसं दिसतं? पाहा ५३ व्या मजल्यावरील अपार्टमेंटचा Inside Video
लग्नासाठी मालदीव का निवडलं?
सनी आणि डॅनियलने पुन्हा लग्न करण्यासाठी मालदीव निवडलं. कारण ते त्यांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. हा खास ट्रिपदरम्यान दोघांनीही एकमेकांना पुन्हा एकदा लग्नातील वचनं दिली. मुलांना त्यांनी कुटुंबाचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी डॅनियलने सनीला एक डायमंड अंगठीदेखील दिली.