अभिनेत्री सनी लिओनी ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. काय दिवसांपूर्वीच ती पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर झळकली. तिची प्रमुख भूमिका असलेला अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘कॅनेडी’ चित्रपटाचं या फिल्म फेस्टिवलमध्ये भरपूर कौतुक झालं. तर आता संपूर्ण काळात तिच्याबरोबर राहिलेल्या तिचा पती डॅनियलसाठी तिने खास पोस्ट लिहिली आहे.
डॅनियलसाठी खास पोस्ट लिहित सनीने त्याचे आभार मानले. तिने लिहिलं, “देवाने तुला माझ्या कठीण काळात माझ्याकडे पाठवलं. त्यावेळी खरोखर तू माझा जीव वाचवलास आणि आजपर्यंत मला साथ करत आला आहेस. गेली पंधरा वर्षं आपण एकत्र आहोत. कान्स फिल्म फेस्टिव्हलचा हा क्षण तुझ्या पाठिंब्याशिवाय अनुभवणं शक्य नसतं झालं.”
आणखी वाचा : लिंक्डइनने ब्लॉक केलं सनी लिओनीचं अकाउंट, कारण ऐकून नेटकरी हैराण
पुढे तिने लिहिलं, “मला पुढे जाण्यासाठी आणि माझी स्वप्न साकार करण्यासाठी तू केलेली लढाई ही खरोखर निस्वार्थतेची उच्च पातळी आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. धन्यवाद!” तर यावर तिचा पती डॅनियलने कमेंट करत सनीचं कौतुक केलं. त्याने लिहिलं, “आज तुझ्याकडे जे आहे ते तू स्वतः कमवलं आहेस…. माझ्याबरोबर किंवा माझ्याशिवाय… माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. ही फक्त सुरुवात आहे.”
सनीची ही पोस्ट आता खूप चर्चेत आली आहे. या पोस्टवर कमेंट करत तिचे चाहते तिच्या कामाचा कौतुक करत आहे तर पण त्याचबरोबर डॅनियल आणि सनीमध्ये असलेला हे घट्ट बॉण्डिंग पाहून नेटकरी भारावले आहेत.