बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या चर्चेत आहे. सुश्मिता सेनने नुकतीच नवी कोरी मर्सिडीज कंपनीची कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व फोटो शेअर करत सुश्मिताने ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
सुश्मिताने ‘मर्सिडीज जीएलई ५३ एएमजी’ हे मॉडेल खरेदी केलं आहे. कार देखो या वेबसाईटनुसार, सुश्मिता सेनने खरेदी केलेल्या मर्जिडीज बेन्झची किंमत १.६४ कोटी इतकी आहे. तर मुंबईत या कारची किंमत १.९२ कोटी म्हणजे जवळपास दोन कोटींच्या घरात आहे. सुश्मिताने ही नवी कोरी गाडी स्वत:ला भेट म्हणून खरेदी केली आहे.
हेही वाचा>> के.एल.राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नाचा मंडप सजला! सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्याचा व्हिडीओ समोर
हेही वाचा>> मुंबईच्या ट्राफिकबाबत अक्षया देवधरची पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली “आता शेंगदाणे विकू…”
सोशल मीडियावर नव्या कोऱ्या मर्सिडीज बेन्झबरोबरचे फोटो सुश्मिताने शेअर केले आहेत. “ज्या महिलांना वाहन चालवायला आवडतं, त्या स्वत:ला हे शक्तिशाली सौंदर्य भेट म्हणून देतात”, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आङे. सुश्मिताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे. तर अनेकांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. सुश्मिताला तिचा भाऊ राजीव सेन व वहिनी चारू असोपा यांनीही शुभेच्या दिल्या आहेत.
हेही वाचा>> महेश कोठारेंना पितृशोक, आजोबांच्या निधनानंतर आदिनाथ कोठारेने शेअर केली भावूक पोस्ट
दरम्यान, सुश्मिता सेन बीसीसीआयचे माजी संस्थापक ललित मोदी यांच्यासह रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्यावर्षी सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी रिलेशनशिपची कबुली दिली होती.