बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली. वयाच्या ४५शीतही फिटनेसकडे विशेष लक्ष देणाऱ्या सुश्मिताला हृदविकाराचा झटका आल्याने तिच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अँजिओप्लास्टीही करण्यात आल्याचं सुश्मिताने पोस्टमध्ये म्हटलं आहे. वडिलांबरोबरचा हसरा फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या आरोग्याबाबत माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुश्मिताला याआधीही गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. ज्यामुळे तिला मनोरंजन विश्वापासून तब्बल चार वर्ष दूर राहावं लागलं होतं. सुश्मिताने एका मुलाखतीदरम्यान याबाबत खुलासा केला होता. “मी बंगाली चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. शूटिंगदरम्यानच मला चक्कर आली आणि मी बेशुद्ध झाले. त्यानंतर मला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा मला एडिसन नावाचा आजार झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या आजारामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स बनवण्याची प्रक्रिया थांबते. या आजाराचा किडनीवर फार गंभीर परिणाम होतो. शरीरातील ग्रंथी खूप कमी प्रमाणात कोर्टिसल व एल्डोस्टेरोन हार्मोन तयार करतात, ज्याची तुमच्या शरीराला जास्त गरज असते”, असं सुश्मिता म्हणाली होती.

हेही वाचा>> Video: डायनिंग टेबलच्या कव्हरपासून उर्फी जावेदने बनवला ड्रेस, नेटकरी म्हणाले “कंडोम…”

“मी खूप आजारी होते. मला दर आठ तासाला औषध घ्यावी लागत होती. या औषधांमुळे माझं वजन झपाट्याने वाढत होतं. माझे डोळ्यांना सूज येऊन त्याखाली डार्क सर्कल आले होते. औषधांमुळे माझे केसही खूप गळत होते. मिस युनिव्हर्स आणि एक अभिनेत्री असल्यामुळे मला कायम तंदुरुस्त राहणे गरजेचं होतं. या सगळ्यामुळे मला टेन्शन यायचं. माझ्या दोन मुलींचा सांभाळ कशी करू? ही चिंता मला असायची”, असंही पुढे सुश्मिता म्हणाली.

हेही वाचा>> Video: “१० रुपये की पेप्सी, श्रद्धा कपूर…” चाहत्यांच्या घोषणेनंतर अभिनेत्रीला हसू अनावर, व्हिडीओ व्हायरल

सुश्मिताने या आजाराचा सामना कसा केला, याबाबतही मुलाखतीत भाष्य केलं. ती म्हणाली, “मला मानसिक तणावाला सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे मी मेडिटेशनचा पर्याय निवडला. त्यानंतर या आजारातूनही मी पूर्णपणे बरे झाले. २०१९ नंतर आता मला कोणताही त्रास होत नाही”. सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याचं समजताच तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटमध्ये बरं होण्यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress sushmita sen heart attack miss universe also suffered with addison disease kak