बॉलीवूडमधील कायमच चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्कर. स्वरा भास्करचा आज वाढदिवस आहे. स्वरा भास्कर तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. ती अनेकदा लोकांसमोर आपले मत मांडताना दिसते. आतापर्यंत तिने जितके चित्रपट केले त्यांपैकी मोजकेच चित्रपट हिट ठरले. पण तिचे फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. स्वराने तिच्या इतक्या वर्षांच्या बॉलीवूड कारकिर्दीत सर्वांचे लक्ष तर तिच्याकडे वेधलेच, पण त्याचबरोबर मोठी संपत्ती कमावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९ एप्रिल १९८८ रोजी स्वराचा जन्म झाला. स्वराने तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. तर त्यानंतर ‘माधोलाल कीप वॉकिंग’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पण ‘तनु वेड्स मनू’ या चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिकेचे खूप कौतुक झाले आणि तिचे नशीब चमकले. स्वराने आतापर्यंत जवळपास २० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण त्यांपैकी अनेक चित्रपट अयशस्वी ठरले आहेत.  तसे जरी असले तरीही स्वरा कोट्यवधींची मालकीण आहे.

आणखी वाचा : महागड्या गाड्या, आलिशान घर अन्…; ‘पुष्पा’ खऱ्या आयुष्यात आहे ‘इतक्या’ संपत्तीचा मालक, आकडा वाचून व्हाल थक्क

स्वरा एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी मानधन आकारते. तर याचबरोबर सोशल मीडिया प्रमोशन आणि ब्रॅण्ड एण्डॉर्समेंटमधूनही ती चांगलीच कमाई करते. दिल्ली आणि मुंबई येथे तिची स्वतःची घरे आहेत. तर अलीकडेच तिने तिच्या मुंबईच्या घराचे इंटिरियर करून घेतले. या इंटरियरसाठी तिने बराच पैसा खर्च केला. याचबरोबर तिच्या गाड्यांचे कलेक्शनही मोठे आहे. त्यात तिच्याकडे बीएमडब्ल्यू एक्स1 ही गाडीही आहे. या गाडीची किंमत जवळपास ४८ लाख आहेत. तर घरे, गाड्या, इन्वेस्टमेंट अशी संपूर्ण मिळून स्वराची संपूर्ण मालमत्ता ४० कोटी आहे.

हेही वाचा : “धर्मांतर केल्यानंतर तुझं…” फहाद अहमदबरोबर गुपचूप लग्न उरकल्यानंतर स्वरा भास्कर ट्रोल

स्वरा भास्कर हिने ६ जानेवारी रोजी समाजवादी पार्टीचा नेता असलेल्या फहाद अहमदबरोबर रजिस्टर लग्न केले. महिनाभर लग्नाची बातमी गुलदस्त्यात ठेवल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यांनी त्यांचे लग्न झाले असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मार्च महिन्यात तिने दिल्लीला तिच्या आजी-आजोबांच्या घरी हळद-मेहंदी असे लग्नापूर्वीचे कार्यक्रमही केले. या लग्नामुळे ती गेले काही दिवस खूप चर्चेत होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress swara bhaskar owned a huge amount of property in mumbai and delhi rnv