बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दृश्यम’ चित्रपट चांगलाच हिट झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडली होती. सस्पेन्स थ्रिलर असलेल्या या चित्रपटातील अजय देवगणचा अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला होता. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यावेळी या चित्रपटातील कलाकार त्यांच्या भूमिकांबद्दल बोलले.

आणखी वाचा : Video: “दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारतेय…” ‘बिग बॉस’च्या घरात अमृता देशमुख आणि यशश्री यांच्यात कडाक्याचे भांडण

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

‘दृश्यम २’ हा अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ‘दृश्यम २’मध्ये काय होणार हे पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. सगळेजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील तब्बूचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित झालं होतं. यातून तब्बू या चित्रपटात तिच्या बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले होतं.

तब्बू या चित्रपटात इन्स्पेक्टर मीरा देशमुखची भूमिका साकारत आहे. अलीकडेच, या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यान तब्बूने तिच्या भूमिकेबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली, “ही भूमिका मी साकारलेल्या सर्वात कठीण भूमिकांपैकी एक आहे. हे पात्र लिहिणाऱ्यांना याचे श्रेय दिले पाहिजे.” नुकताच या चित्रपटातील अजय देवगणचे फर्स्ट लूक पोस्टर समोर आले होते. त्यात अजय देवगण एका दमदार व्यक्तिरेखेत दिसला. आता आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा : तब्बूने अजय देवगणसाठी केलेल्या खास पोस्टने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, म्हणाली….

अजय देवगणचा ‘दृश्यम’ चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. या चित्रपटात अजयसह श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका होत्या. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने ६७.१७ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. आता याचा दुसरा भाग येत्या १८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader