दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाची ‘जी करदा’ ही वेब सीरिज १५ जूनला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. सध्या या सीरिजमुळे तमन्ना चांगलीच चर्चेत आली आहे. करिअरमध्ये पहिल्यांदाच ‘जी करदा’ सीरिजमध्ये तमन्नाने बोल्ड इंटिमेट सीन शूट केले आहेत. मात्र, अभिनेत्रीचे बोल्ड सीन पाहून तिचे चाहते काहीसे नाराज झाले असून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
तमन्ना भाटियाचे ‘जी करदा’ सीरिजमधील इंटिमेट सीन सोशल मीडियावर व्हायरल होऊन तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, “फिल्मी करिअरला १८ वर्षं पूर्ण झाल्यावर अखेर बॉलीवूडमध्ये तमन्नावरसुद्धा बोल्ड सीन करण्याची वेळ आलीच…” दुसऱ्या एका युजरने “तमन्ना भाटिया करिअरच्या दुसरी इनिंगमध्ये आहे. ‘जी करदा’ आणि ‘लस्ट स्टोरीज’मधल्या अशा ढंगातील भूमिका स्वीकारण्याआधी तू थोडा तरी विचार करायला पाहिजेस,” अशी कमेंट करीत अभिनेत्रीला ट्रोल केले आहे.
हेही वाचा : साडी नेसायला ३० मिनिटे, लुकसाठी ३ तास; ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणे नवाजुद्दिन सिद्दिकीसाठी नव्हते सोपे
तमन्नाला तिने आधी साकारलेल्या भूमिकांची आठवण करून देताना नेटकरी म्हणाले, “बाहुबलीमध्ये दिग्दर्शक एस. एस. राजामौलीसोबत काम करणारी तमन्ना भाटिया आता अशा भूमिका करतेय हेच दुर्दैव आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकाराने बॉयकॉट बॉलीवूडच्या ट्रेण्डला सपोर्ट केला पाहिजे.”
तमन्नाला चित्रपटसृष्टीत पदार्पण करून १८ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. साऊथ सिनेसृष्टीत तमन्नाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये बोल्ड सीन करणे तिच्या चाहत्यांना आवडले नाही. दरम्यान, तमन्नाच्या ‘जी करदा’ या ८ भागांच्या रोमॅंटिक ड्रामा असलेल्या वेब सीरिजचे दिग्दर्शन अरुणीता शर्मा यांनी केले आहे. यामध्ये तमन्ना भाटिया, सुहेल नय्यर, आशिम गुलाटी आणि अन्या सिंह हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.