ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहून प्रेक्षक नाराज झाले आहेत. या चित्रपटावर सर्वत्र टीका केली जात आहे. प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारांनी देखील या चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त केली. आता या चित्रपटावर होणाऱ्या टीकेवर अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने भाष्य केलं आहे.

‘आदिपुरुष’मध्ये दाखवलेली दृश्यं, या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, या चित्रपटाचे व्हीएफएक्स या सगळ्यावरच टीका केली जात आहे. पण यापेक्षा जास्त या चित्रपटातील संवादांवर संताप व्यक्त केला जात आहे. या चित्रपटातील संवादांवर होणाऱ्या टीकेनंतर आता या चित्रपटाच्या टीमने या चित्रपटाच्या संवादांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या सगळ्यावर या चित्रपटात शूर्पणखाची भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने तिचं मत व्यक्त केलं आहे.

GN Saibaba, GN Saibaba passes away,
बिनबंदुकीचा नक्षलवादी- नायक की खलनायक?
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Dipa Karmakar
व्यक्तिवेध: दीपा कर्माकर
Rashmi Joshi, cancer, support, Rashmi Joshi news,
रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड!
actress priya bapat interview loksatta
Raat Jawaan Hai Promotion: भिन्न प्रकृतीची चारही माध्यमे वैशिष्ट्यपूर्ण; अभिनेत्री प्रिया बापटचे मत
Palak Sindhwani Legal Battle Taarak Mehta Ka Ooltah Chashmah makers
“बदनाम करण्यासाठी…”, ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांवर अभिनेत्रीचे मानसिक छळाचे आरोप, मालिका सोडण्याचा निर्णय
Pragya Daya Pawar opposition to the role of Vanchit Bahujan Aghadi which is protesting in front of the house of intellectuals
‘वंचित’च्या भूमिकेचा स्त्री लेखिका-कार्यकर्तींकडून निषेध
Prabhatai, Hariprasad Chaurasia, Prabhatai Atre,
संगीत हेच प्रभाताईंचे पहिले प्रेम, पं. हरिप्रसाद चौरासिया यांची भावना

हेही वाचा : “‘आदिपुरुष’ हा ओम राऊतच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट…,” प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याची दिग्दर्शकावर जोरदार टीका, नाराजी व्यक्त करत म्हणाला…

‘इ टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “या चित्रपटात मी छोटीशी पण महत्त्वाची भूमिका साकारली ती म्हणजे शूर्पणखाची. या चित्रपटाचा मला भाग होता आलं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.” या चित्रपटाच्या संवादांवर होणाऱ्या टीकेबद्दल ती म्हणाली, “या चित्रपटाचे निर्माते या चित्रपटामधील संवादांमध्ये बदल करण्याचं काम करत आहेत आणि मला वाटतं की हा एक खूप चांगला निर्णय आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट कधीच कोणताही वाद निर्माण करण्यासाठी बनवला गेलेला नाही.”

आणखी वाचा : “मारुतीरायाचा आणि आपल्या रामाचा अपमान…,” देवदत्त नागेवर नेटकरी नाराज, म्हणाले, “तुम्हाला वाटलं नाही का की…”

दरम्यान, ‘आदिपुरुष’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत जगभरातून ३४० कोटींची कमाई केली. परंतु काल या चित्रपटाला खूप मोठा फटका बसला. पहिले तीन दिवस रोज ५० ते ६० कोटी कमावणाऱ्या या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने काल फक्त ९ ते १० कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे आता प्रेक्षक या चित्रपटाकडे पाठ फिरवत असल्याचं चित्र दिसत आहे.