‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित झाला ऋषभ मराठी प्रेक्षकांना अनेक सरप्राइजेस मिळाली. या चित्रपटात अभिनेता प्रभासने श्रीरामांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. याचबरोबर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे याने या चित्रपटामध्ये हनुमानाची भूमिका साकारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीपर्यंत फक्त देवदत्त नागे हा मराठमोळा अभिनेता या चित्रपटामध्ये झळकणार हे प्रेक्षकांना माहीत होतं. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटामध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे या आघाडीच्या अभिनेत्रीही महत्वपूर्ण भूमिकेत दिसल्या. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने या चित्रपटामध्ये शूर्पणखाची भूमिका साकारली आहे. आता या चित्रपटामध्ये काम करण्यासाठीचा अनुभव कसा होता हे तिने सांगितलं आहे.

आणखी वाचा : “वाद निर्माण करण्यासाठी…,” ‘आदिपुरुष’मधील संवादांवरुन होणाऱ्या टीकेवर तेजस्विनी पंडितचं भाष्य, म्हणाली…

‘इ टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “या चित्रपटात मी छोटीशी पण महत्त्वाची भूमिका साकारली ती म्हणजे शूर्पणखेची. या चित्रपटाचा मला भाग होता आलं की माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. ओम राऊत मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून काम करत असल्यापासून त्याची आणि माझी मैत्री आहे. तो या चित्रपटात शूर्पणखाच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात होता आणि मी त्याची पहिली पसंती होते. त्याने केलेल्या अभ्यासातून त्याला हे जाणवलं की शूर्पणखा खूप सुंदर होती. त्यामुळे या भूमिकेसाठी मला कास्ट करण्याबाबत तो ठाम होता.”

हेही वाचा : “‘आदिपुरुष’ हा ओम राऊतच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट…,” प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याची दिग्दर्शकावर जोरदार टीका, नाराजी व्यक्त करत म्हणाला…

पुढे ती म्हणाली, “या चित्रपटात काम करण्याचा माझा अनुभव खूप चांगला होता. या चित्रपटात माझ्याबरोबर कोण काम करणार हे कळल्यावर मी खूपच खुश झाले होते. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान यांच्याबरोबर मला स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. या सर्वांचा अभिनय क्षेत्रातील अनुभव हा खूप दांडगा आहे. याचबरोबर ते खूप नम्र आणि सहकलाकाराला सांभाळून घेत काम करणारे कलाकार आहेत.” आता तेजस्विनीचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.