Swini Khara Urvish Desai Wedding Photos : अमिताभ बच्चन आणि तब्बू स्टारर २००७ मध्ये आलेल्या ‘चीनी कम’ या चित्रपटाची बालकलाकार स्विनी खारा हिने लग्न केलं आहे. तिने लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनय सोडून वकील झालेल्या स्विनीने बुधवारी (२७ डिसेंबर) उर्विश देसाईशी लग्नगाठ बांधली. स्विनी व उर्विश यांनी राजस्थानमधील जयपूर लग्न केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मला माझं प्रेम आणि जीवलग मिळाला आहे. आमच्या सर्वात खास दिवशी आमचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते, याचा आनंद वाटतोय,” अशा आशयाचे कॅप्शन स्विनीने फोटोंना दिलं आहे. तसेच त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. लग्नात स्विनीने पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता व लाल रंगाची ओढणी घेतली होती. तर उर्विशने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने लोणावळ्यात बांधली लग्नगाठ, फोटो पाहिलेत का?

स्विनी व उर्विशच्या लग्नाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. दरम्यान, स्विनी बालकलाकार म्हणून खूप लोकप्रिय झाली होती. तिने विद्या बालन आणि सैफ अली खानच्या ‘परिणीता’ आणि शाहिद कपूरच्या ‘पाठशाला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. पण ‘चीनी कम’ मधील तिच्या भूमिकेला चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती. ती शेवटची सुशांत सिंह राजपूतच्या ‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये दिसली होती.

Video: ५८ वर्षीय अभिनेत्याने दुसऱ्यांदा केलं लग्न, आईसह त्याचा १६ वर्षांचा मुलगाही होता उपस्थित

‘बा बहू और बेबी’, ‘दिल मिल गये’ आणि ‘जिंदगी खट्टी मिठी’ यांसारख्या टीव्ही शोमध्ये स्विनीने काम केले होते. तिची टेलिव्हिजन कारकीर्द यशस्वी राहिली होती. ‘सीआयडीमध्ये’ही तिने काही एपिसोडमध्ये अभिनय केला होता. अभिनय सोडल्यानंतर तिने आपले शिक्षण पूर्ण केले आणि प्रॅक्टिसिंग वकील बनली. तर स्विनीचा पती उर्विश हा इंजिनिअर आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress turned advocate swini khara ties knot with urvish desai wedding photos out hrc