अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची गणना बी-टाऊनमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. दोघेही एकमेकांचे कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आज जगभरात फादर्स डे साजरा केला जात आहे. सोशल मीडियावर यूजर्स त्याच्या वडिलांसोबतचे फोटो शेअर करून त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करत आहेत. अशातच ट्विंकलनेही अक्षय कुमारबरोबरचा एक फोटो शेअर करत त्याच्याशी लग्न करण्यामागचं प्रमुख कारण स्पष्ट केलं आहे.
ट्विंकल खन्ना मनोरंजन सृष्टीपासून जरी दूर असली तरीही सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आज ‘फादर्स डे’च्या निमित्ताने तिने अक्षय बरोबरचा एक फोटो शेअर करत त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
त्या दोघांचा एक फोटो शेअर करत तिने लिहिलं, “खिलाडी कुमार त्याच्या घरच्यांबरोबर कसा वागतो हे मी पाहिलं. ते पाहून मला जाणवलं की हा भविष्यात उत्तम वडील होऊ शकतो आणि हेच त्याच्याशी लग्न करण्यामागचं पहिलं कारण होतं. याचबरोबर माझी भविष्यात होणारी मुलं अक्षयचे काही महत्त्वाचे गुण घेतील असंही मला तेव्हा वाटलं. वयाच्या पन्नाशीला त्याचा फिटनेस पाहा. माझ्या मुलांनी अक्षयचे काही अनुवांशिक गुण जरी घेतले तरीही ते खूप भाग्यवान आहेत असंच मी म्हणेन. जो त्याच्यापेक्षा आधी त्याच्या कुटुंबाचा विचार करतो अशा या व्यक्तीला हॅपी फादर्स डे.”
हेही वाचा : Video: अक्षय कुमारचा असह्य अवतार…नेटकऱ्यांआधी बायकोकडूनच झाला ट्रोल
आता ट्विंकलची ही पोस्ट खूप व्हायरल होत असून त्यावर कमेंट करत नेटकरी अक्षयचं आणि त्या दोघांच्या बॉण्डिंगचं कौतुक करत आहेत.