Actress Uma Dasgupta : ‘पथेर पांचाली’ हा सत्यजीत रे यांनी दिग्दर्शित केलेला अजरामर सिनेमा आहे. आजही या सिनेमाची उदाहरणं दिली जातात. त्याचप्रमाणे विविध चित्रपट महोत्सवांमध्ये हा सिनेमा दाखवला जातो या सिनेमाचा अभ्यास केला जातो, रसास्वाद घेतला जातो. याच चित्रपटात ‘दुर्गा’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री उमा दासगुप्ता ( Actress Uma Dasgupta ) यांचं निधन झालं आहे. उमा दासगुप्ता यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
उमा दासगुप्ता यांचं सकाळी ८ वाजता निधन
उमा दासगुप्ता ( Actress Uma Dasgupta ) यांचं सकाळी ८ वाजताच्या दरम्यान निधन झालं. उमा दासगुप्ता यांनी ‘पथेर पांचाली’ या अजरामर सिनेमात दुर्गा नावाचं पात्र साकारलं होतं. ही दुर्गा ( Actress Uma Dasgupta ) आजही लोकांच्या स्मरणात आहे. भावाला सांभाळणारी, अवखळ, तितकीच शांत, प्रसंगी आक्रमक असणारी दुर्गा ही भूमिका उमा दासगुप्ता शब्दशः जगल्या होत्या. उमा दासगुप्ता या लहानपणापासूनच नाटकांमध्ये काम करत होत्या. सत्यजीत रे यांना जेव्हा दुर्गा या पात्रासाठी अभिनेत्री हवी होती तेव्हा त्यांना उमा यांचं पाहिलेलं काम आठवलं. ज्यानंतर ही भूमिका उमा दासगुप्ता ( Actress Uma Dasgupta ) यांच्या वाट्याला आली होती.
पथेर पांचाली हा सिनेमा एका कादंबरीवर आधारित
‘पथेर पांचाली’ हा सिनेमा बिभुतीभूषण बंदोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित सिनेमा आहे. हा सिनेमा अप्पू आणि दुर्गा या दोन बहीण भावांची आणि त्यांच्या कुटुंबाची कहाणी आहे. ही दोन पात्र यातली मध्यवर्ती पात्रं आहेत. अप्पू हे पात्र सौमित्र चॅटर्जी यांनी साकारलं होतं. सौमित्र चॅटर्जीही आता हयात नाहीत. तसंच उमा दासगुप्ता यांनीही सकाळी ८ च्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. दुर्गा हे पात्र उमा दासगुप्ता यांनी अजरामर केलं होतं यात शंकाच नाही.
अभिनेते चिरंजीत चक्रवर्ती यांनी दिलं निधनाचं वृत्त
उमा दासगुप्ता यांच्या निधनाचं वृत्त अभिनेते चिरंजीत चक्रवर्ती यांनी दिलं. मागील काही दिवसांपासून उमा दासगुप्ता यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मुलीने ही माहिती चिरंजीत चक्रवर्ती यांना दिली असंही त्यांनी म्हटलं आहे. पथेर पांचाली हा १९५५ मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा आहे. मात्र या सिनेमाचं गारुड आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. या सिनेमातली दुर्गा ही भूमिका अजरामर करणाऱ्या उमा दासगुप्ता यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.