उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. जवळपास रोजच ती हटके कपड्यांमध्ये दिसते. तिच्या अतरंगी फॅशनमुळे आतापर्यंत अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलं आहे. तसं जरी असलं तरी तिचा चाहतावर्ग मोठा आहे. अनेकदा ती मुंबईच्या रस्त्यांवर बिनधास्तपणे वावरताना दिसते, फोटोग्राफर्सना पोज देते आणि त्यांच्याशी आणि चाहत्यांशी संवादही साधते. आता तिने चक्क गरजूंना ५००च्या नोटा वाटल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्फीचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. मुंबईतील एका महागड्या हॉटेलमध्ये ती नुकतीच जेवायला गेली होती, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. या वेळी तिने लोकरीची शॉर्ट्स आणि क्रॉप टॉप परिधान केला होता आणि त्यावर गुलाबी ब्लेझरही घातला होता. पण या हॉटेलमधून बाहेर पडताना तिने जे केलं ते पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य वाटलं आहे.

आणखी वाचा : “मी त्यांना नकार दिला पण तरीही ते…” कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल उर्फी जावेदचा गौप्यस्फोट

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उर्फी हॉटेलमधून बाहेर येत तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सना पोज देताना दिसत आहेत. पोज देऊन झाल्यावर ती गाडीत बसण्यासाठी जिने उतरू लागली. इतक्यात एक छोटा गरजू मुलगा तिच्याकडे आला आणि त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. उर्फीनेही कुठलीही तक्रार न करता लगेच त्याला तिच्या पाकिटातून ५०० रुपये काढून दिले. तिने त्याला ५००ची नोट देताच आणखी एक गरजू व्यक्ती तिच्याकडे आली आणि त्या व्यक्तीने उर्फीकडे पैसे मागितले. उर्फीने त्या व्यक्तीलाही ५००ची नोट देत आर्थिक मदत केली. तिने त्या व्यक्तीला नोट देताच पुन्हा एकदा तो लहान मुलगा तिच्याकडे आला आणि आणखीन पैसे मागू लागला. पण त्या वेळी मात्र उर्फीने त्याला हसऱ्या चेहऱ्याने नकार देत तिथून जायला सांगितलं.

हेही वाचा : उर्फी जावेदने खरेदी केली नवी कोरी आलिशान गाडी; किंमती ऐवजी ‘हे’ कारण वाचलंत तर व्हाल थक्क

हा व्हिडीओ समोर येताच नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. काहींनी- “कपडे विचित्र घालत असली तरीही ती मनाने चांगली आहे,” असं म्हणत उर्फीचं कौतुक केलं. तर काहींनी याला प्रतिक्रिया देत- “हे सगळे पब्लिसिटी स्टंट आहेत,” असं म्हटलं आहे. त्यामुळे आता उर्फी या तिच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress urfi javed distributes 500 notes to needy people video viral rnv