Urmila Matondkar and Mohsin Akhtar Mir Divorce News: मराठमोळी अभिनेत्री व राजकारणी उर्मिला मातोंडकर हिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. उर्मिला पती मोहसीन अख्तर मीरपासून घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. उर्मिलाने आठ वर्षांपूर्वी काश्मिरी व्यावसायिक व मॉडेल असलेल्या मोहसीनशी आंतरधर्मीय लग्न केलं. आता दोघांच्याही नात्यात दुरावा आला आहे, असे वृत्त आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्मिला व मोहसीन २०१६ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. उर्मिला मातोंडकरने लग्नाच्या आठ वर्षानंतर पती मोहसीन अख्तर मीरपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. ‘ई टाइम्स’ने मुंबईतील एका न्यायालयातील सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, “उर्मिलाने चार महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.”

अरबाज पटेलविरोधात त्याची गर्लफ्रेंड पोलीस तक्रार करणार? म्हणाली, “तो चुकीचा माणूस…”

उर्मिला व मोहसीन परस्पर सहमतीने विभक्त होत नसल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे. न्यायालयातील एका सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, “खूप विचार केल्यानंतर उर्मिलाने मोहसीनबरोबरचे लग्न संपवण्याचा निर्णय घेतला आहे. तिने आधीच कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. विभक्त होण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही, पण तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. हा घटस्फोट परस्पर सहमतीने होत नाहीये.”

‘या’ दिग्गज अभिनेत्याने मांसाहारासाठी भाड्याने घेतलेलं घर, सचिन पिळगांवकर यांचा खुलासा; म्हणाले, “त्यांचे कुटुंबीय…”

उर्मिला मातोंडकर व मोहसीन अख्तर मीर (फोटो – इन्स्टाग्राम)

उर्मिला व मोहसीन यांची भेट त्यांचा मित्र आणि बॉलीवूड डिझायनर मनीष मल्होत्रा मार्फत झाली होती. दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी ३ मार्च २०१६ रोजी खासगी समारंभात लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. उर्मिला व मोहसीन यांच्या वयात १० वर्षांचे अंतर आहे, त्यामुळे यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. उर्मिला ५० वर्षांची आहे, तर मोहसीन ४० वर्षांचा आहे.

“…अन् आमिर खडकामागे जाऊन रडू लागला”; ट्विंकल खन्नाने सांगितला किस्सा, म्हणाली, “मी अक्षयबद्दल…”

कोण आहे मोहसीन अख्तर मीर?

Who is Mohsin Akhtar Mir: मोहसीन हा मूळचा काश्मिरचा आहे. तो व्यावसायिक आणि मॉडेल आहे. मोहसीनने २००९ मध्ये ‘इट्स अ मॅन्स वर्ल्ड’ चित्रपटातून पदार्पण केले, नंतर त्याने त्याच वर्षी ‘लक बाय चान्स’ मध्ये काम केलं. दोन वर्षांनी तो ‘मुंबई मस्त कलंदर’ मध्ये झळकला. त्याने ‘बी.ए. पास’ चित्रपटातही काम केलं होतं. आता तो मनीष मल्होत्राच्या ब्रँडबरोबर मिळून काम करतो, असं म्हटलं जातं.

उर्मिला व मोहसीन या दोघांनीही याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress urmila matondkar files divorce from husband mohsin akhtar mir according to reports hrc