बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशीने तिचे केस कापत इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. याबद्दल तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्टही शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उर्वशीने केस कापतानाचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तिने इराणमधील आंदोलनात मृत्यूमुखी पडलेली महिला आणि उत्तराखंडमधील अंकिता भंडारीसाठी केस कापून पाठिंबा दर्शविला आहे. उर्वशीने पोस्टमध्ये “हिजाब विरोधी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या २२ वर्षीय महसा अमिनीसाठी आंदोलन करत असलेल्या इराणमधील महिला आणि उत्तराखंड प्रदेशातील १९ वर्षीय अंकिता भंडारीला पाठिंबा दर्शविण्यासाठी मी माझे केस कापत आहे”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा >> Video : तैमूर खानचा तायक्वांदो खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले “ऑलिम्पिकमध्ये…”

पुढे उर्वशीने “जगभरातील स्त्रिया त्यांचे केस कापून इराणमधील सरकारविरोधातील आंदोलनात सहभागी होत आहेत. महिलांचा आदर करा. केस हे स्त्रियांच्या सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. केस कापून महिला समाजाने महिलांच्या सौंदर्याबद्दल बनवलेल्या प्रतिमेचं खंडन करत आहेत. आमच्या इच्छेप्रमाणे आम्ही कपडे परिधान करू, असंच त्यांना यातून सुचवायचं आहे. आम्ही कसे आणि कोणते कपडे परिधान करायचे, हे ठरवण्याचा अधिकार कोणालाच नाही. जेव्हा महिला एकत्र येऊन एका स्त्रीची समस्या समजून घेतात, तेव्हा ती संपूर्ण जगातील स्त्रियांची समस्या बनते. आणि त्यामुळे महिलांना कमी लेखणाऱ्यांना स्त्रीचं सामर्थ्याची जाणीव होते”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा >> कियारा अडवाणीबरोबरच्या लग्नाच्या चर्चांवर सिद्धार्थ मल्होत्राला शुभेच्छा देत सलमान खान म्हणाला, “शादी मुबारक…”

हेही पाहा >> Photos : आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं पाऊट

हिजाब संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांच्या मारहाणीत २२ वर्षीय महसा अमिनी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ इराणमधील महिला आक्रमक झाल्या आहेत. तर उत्तराखंडमधील १९ वर्षीय अंकिता भंडारीचा सप्टेंबर महिन्यात संशायस्पदरित्या मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress urvashi rautela chopped her hair to support iranian womens protesters kak
Show comments