बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. उर्वशीने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘आय लव्ह यू’ असं म्हणतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. उर्वशीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यावरुन तिला ट्रोलही केलं जात आहे.
उर्वशीने या व्हिडीओसंदर्भात स्पष्टीकरण देणारी एक पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे. “माझा आय लव्ह यू म्हणतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी ही पोस्ट शेअर करत आहे. त्या व्हिडीओमध्ये केवळ अभिनय करण्यात आलेला आहे. व्हिडीओमधील डागलॉग हा कोणाला उद्देशून म्हणालेले नाही”, असं तिने स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा >> “हा मुलगा कोण?”, ‘मनमर्जिया’च्या ट्रेलरमध्ये विकी कौशलला पाहून कतरिनाला पडला होता प्रश्न

हेही पाहा >> Photos : आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं पाऊट
उर्वशीने व्हायरल व्हिडीओमध्ये “आप बोलो आय लव्ह यू…नही पहले आप बोलो आय लव्ह यू…एक बार बोल दो…बस एक बार बोल दो”, असं ती म्हणताना दिसत होती. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी ऋषभ पंतचं नाव घेत कमेंटही केल्या होत्या. भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत आणि उर्वशी काही काळ एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. परंतु, नंतर एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतरही ते कायम चर्चेत असतात.
हेही वाचा >> आलिया भट्ट गिरगावमधील ‘या’ रुग्णालयात देणार बाळाला जन्म
उर्वशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ती अनेक व्हिडीओ आणि फोटो तिच्या सोशल मीडियावरुन शेअर करत असते. उर्वशीने नुकतंच केस कापतानाचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. इराणमधील महिलांच्या हिजाबविरोधी आंदोलानाला तिने केस कापत पाठिंबा दर्शविला होता.