कलाकार मंडळी चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. पण दुसऱ्याबाजूला कलाकारांचे फेक अकाउंट तयार करून धमकी देणे, पैसे बळकावणे हे प्रकार केले जातात. त्यामुळे कलाकार अडचणीत सापडतात. असं काहीस बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन हिच्याबरोबर घडलं आहे. पण अभिनेत्रीने याविरोधात मुंबई पोलिसात धाव घेतल्याचं समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री विद्या बालनने तिच्या नावाने फेक अकाउंट तयार करून फसवणूक करण्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, विद्या बालनने खार पोलीस ठाण्यामध्ये अज्ञान व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटलं आहे की, अभिनेत्रीच्या नावाने एका व्यक्तीने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार केले होते. ज्याद्वारे ही व्यक्ती लोकांकडून पैशांची मागणी करत असे. एवढंच नाहीतर ही व्यक्ती नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन देत होती. त्यामुळे विद्या बालनच्या तक्रारी नंतर मुंबई पोलिसांनी आयपीसी कलम ६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – “कुणीतरी येणार येणार गं…”, ‘सुख म्हणजे नक्की असतं’ फेम अभिनेता होणार बाबा, आनंदाची बातमी देत म्हणाला…

सध्या विद्यान बालन बॉलीवूडमध्ये फारशी दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर ९ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. विद्या इन्स्टाग्रामवर नेहमी चाहत्यांच्या मनोरंजनसाठी मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते.

हेही वाचा – Video: प्रेम, लग्नातील गोंधळ अन्…; सिद्धार्थ जाधवच्या ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती मोठ्या पडद्यावर पुन्हा झळकणार आहे. मंजुलिकाच्या रुपात ती पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनने ‘भूल भुलैया ३’ चित्रपटातील मंजुलिकाची भूमिका विद्या बालन करणार असल्याचं जाहीर केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress vidya balan files complaint with khar police over fake accounts on social media pps