कुमार गौरव (Kumar Gaurav) आणि विजयता पंडित (Vijayta Pandit) या दोघांनी १९८१ मध्ये ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या चित्रपटात काम करताना दोघे खऱ्या आयुष्यात प्रेमात पडले होते. कुमार गौरव हा सुपरस्टार राजेंद्र कुमार यांचा मुलगा होता. राजेंद्र कुमार यांना गौरव व विजयता यांचं नातं मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी गौरवचे लग्न राज कपूर यांची मुलगी रीमाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. राज कपूर (Raj Kapoor) आणि राजेंद्र कुमार यांची घनिष्ठ मैत्री होती, पण कुमार गौरवला मात्र रीमाशी लग्न करायचं नव्हतं. त्याने साखरपुड्याच्या दिवशी आपली अंगठी फेकून देण्याचा प्रयत्न केला होता, असं विजयताने सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लेहरेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत विजयताने तिच्या व कुमार गौरवच्या नात्याबद्दल सांगितलं. विजयता व कुमार गौरव यांचं नातं संपावं यासाठी राजेंद्र कुमार यांनी मुलाचे लग्न रीमा कपूरशी लावण्याचा निर्णय घेतला होता, असं विजयताने म्हटलंय. “आमचा निम्मा चित्रपट शूट झाला होता आणि आम्ही प्रेमात पडलो होतो. राजेंद्र कुमार जी यांना कळालं की आम्ही प्रेमात पडलोय त्यामुळे त्यांनी कुमार गौरवचे रीमा कपूरशी लग्न करायचे ठरवले. त्यांनी आणि राज कपूर यांनी आपल्या मुलांचे लग्न करायचे हे आधीच ठरवले होते, त्यामुळे त्याची आणि रीमाची एंगेजमेंट झाली,” असं विजयता म्हणाली.

दारूची नशा, सिगारेटचे चटके अन्…; नर्गिसने सुनील दत्त यांच्याशी लग्न केल्यावर राज कपूर यांची ‘अशी’ झाली होती अवस्था

रीमा-कुमार गौरवच्या साखरपुड्याला गेली होती विजयता

विजयता त्यावेळी कुमार गौरवच्या प्रेमात होती, तरीही ती त्याच्या साखरपुड्याला (Kumar Gaurav Reema Kapoor Engagement) गेली होती. “मी पाहिलं की रीमाने त्याला एक मोठा हिरा असलेली अंगठी घातली होती, पण त्याला खूप राग आला होता, तो मला म्हणाला, ‘तुला आवडत नसेल तर मी अंगठी फेकून देईन’. मग मी तिथून निघून गेले,” असं विजयता म्हणाली. विजयाने दावा केला की रीमाशी साखरपुडा झाल्यावरही कुमार गौरव तिच्या संपर्कात होता. तिच्या पालकांनी यावर आक्षेप घेतल्यावर त्याने वचन दिलं की तो तिच्याशी लग्न करेल. पण काही दिवसांनी तिला त्याच्याबद्दल आणखी एक गोष्ट कळाली, ज्यामुळे तिला धक्का बसला.

वडिलांचे प्रसिद्ध अभिनेत्रीशी होते अफेअर, आईला कळालं अन् ती…; खुद्द ऋषी कपूर यांनी केलेला खुलासा

कुमार गौरवने नर्गिसच्या मुलीशी केलं लग्न

रीमाशी साखरपुडा झाल्यावरही विजयताशी बोलणारा कुमार गौरव एकीकडे विजयताशी लग्न करण्याचं वचन तिच्या वडिलांना देत होता. दुसरीकडे तो सुनील दत्त आणि नर्गिस यांची मुलगी नम्रताला डेट करत होता. “काही दिवसांनंतर मला कळालं की त्याचे नम्रता दत्तबरोबर अफेअर आहे. त्याने रीमाबरोबरचा साखरपुडा मोडला, पण त्यावेळी मला त्याच्याशी काही घेणं-देणं नव्हतं,” असं विजयता म्हणाली.

“माझे पती देखणे अन् रोमँटिक आहेत, त्यामुळे…”; नर्गिस यांना स्पष्टच बोलल्या होत्या राज कपूर यांच्या पत्नी

दरम्यान, राज कपूर आणि नर्गिस यांचे अफेअर होते. ब्रेकअपनंतर नर्गिसने सुनील दत्त यांच्याशी लग्न केलं होतं. राज कपूर यांच्या मुलीशी साखरपुडा मोडून कुमार गौरवने १९८४ मध्ये नर्गिसची लेक नम्रताशी लग्न केलं, त्यांना दोन मुली आहेत. दुसरीकडे विजयताने १९९० मध्ये संगीतकार आदेश श्रीवास्तवशी लग्न केलं आणि त्यांना दोन मुलं आहेत. आदेश यांचे २०१५ मध्ये कर्करोगामुळे निधन झाले. तर रीमा कपूरने मनोज जैन यांच्याशी लग्न केलं आणि त्यांना आदर जैन आणि अरमान जैन ही दोन मुलं आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress vijayta pandit says kumar gaurav broke engagement with raj kapoor daughter reema for nargis daughter namrata dutt hrc