अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या बेधडक अंदाजासाठी ओळखले जाते. सोशल मीडियावर सक्रिय राहून तिला समाजातील पटणाऱ्या किंवा खटकणाऱ्या गोष्टी ती अगदी बिनधास्तपणे मांडते. याचबरोबर चर्चेत असतं ते तिचं बोलणं. कंगनाच्या बोलण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. फक्त तिचे चाहतेच नाही तर अनेक बॉलीवूड कलाकार देखील कंगनाची मिमिक्री करताना दिसतात. आता अभिनेत्री यामी गौतम हिने कंगनाची मिमिक्री केली आहे आणि विशेष म्हणजे या व्हिडीओवर स्वतः कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यामी गौतमचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती कंगनाची मिमिक्री करताना दिसत आहे. हा व्हिडीओ कंगनाच्या पाहण्यात आला आणि तिला देखील हसू आवरलं नाही. हा व्हिडीओ कंगनाने शेअर करत तिने यामीला खोडकर म्हटलं.

आणखी वाचा : “सिनेसृष्टीत क्वचितच…” सिद्धार्थ-कियाराच्या विवाह सोहळ्यापूर्वी कंगना रणौतची खास पोस्ट

या व्हायरल व्हिडीओमध्ये यामी कंगनाच्या स्टाईलमध्ये बोलताना दिसत आहे. ती म्हणते, “आपण पुढील चित्रपट एकत्र केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. पण ती स्क्रिप्ट आणि तो रोल चांगला असायला हवा. तुम्ही कराल का?” हे सगळे आम्ही तंतोतंत कंगनाच्या स्टाईलमध्ये बोलते. यामीने केलेली ही मिमिक्री कंगनाला देखील आवडली.

हेही वाचा : “…तर त्यांनी शो सोडावा,” ‘मास्टरशेफ इंडिया’वर प्रेक्षक नाराज, जाणून घ्या नेमकं काय घडलं

हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं, “तू खोडकर आहेस. पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू तेव्हा मी हे तुला करायला लावणार आहे.” त्याचबरोबर तिने हसण्याचे इमोजी देखील टाकले. आता यामीचा हा व्हिडीओ खूपच चर्चेत आला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत कंगनाचे आणि यामीचे चाहते यामीचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress yami gautam did kangana ranaut mimicry video gets viral rnv