बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या तिच्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटाबाबत देशभरात वाद सुरू असताना दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दररोज चांगली कमाई करीत आहे. आज अदा शर्माचा वाढदिवस आहे. दरम्यान, अदाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ती शिवलिंगासमोर बसून शिवतांडवचा पाठ करताना दिसत आहे. अदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “‘द केरला स्टोरी’ चित्रपट करमुक्त करावा”, विश्व हिंदू परिषदेचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना पत्र

अदा शर्माने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ती मंदिरातील शिवलिंगासमोर बसलेली दिसत आहे. ती नियमानुसार शिवतांडव पठण करीत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अदाने लिहिले, ‘माझ्या उर्जेचे रहस्य. ऊर्जा जी मला निर्बंधांचा सामना करण्यास अनुमती देते. मला तुमची बनवल्याबद्दल धन्यवाद.

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून अनेक ठिकाणी वाद सुरू आहे. या चित्रपटामुळे विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे देशातील विविध राज्य सरकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या चित्रपटावर पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये बंदी घातली गेली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरयाणात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. तसेच दिल्लीतही हा चित्रपट करमुक्त करावा, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे.

हेही वाचा- ‘आदिपुरुष’च्या ट्रेलर लॉंचिंगवेळी क्रिती सेनॉनने नेसली २४ कॅरेट सोन्याची साडी; काय आहे यात खास, घ्या जाणून…

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या कथानकात केरळ राज्यातील मुलींची फसवणूक कशा पद्धतीने करण्यात आली होती, याचे वास्तव चित्रण दाखवण्यात आले आहे. केरळमधील दहशतवादी कटांवर आधारित हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करीत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण ५६.७२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adah sharma birhday actress recites shivtandav stotram video viral dpj