अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली. नुकताच अदाचा ‘बस्तर- द नक्षल स्टोरी’ चित्रपट १५ मार्च रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. अदाच्या मराठमोळ्या अंदाजाने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. अनेकदा सोशल मीडियावर ती मराठीत संवाद साधताना किंवा एखादे मराठी गाणे गाताना दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अदा सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी शेअर करताना दिसते. अनेकदा तिने तिच्या आजीचा उल्लेख केला आहे. एकदा तर तिने तिच्या आजीची ६५ वर्षांपूर्वीची जुनी साडी नेसली होती. अशातच आता नात अदा आणि आजीचा मराठी गाण्यावर धमाकेदार डान्स करतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

अदाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आजीबरोबर डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘गुलाबी साडी’ या मराठी गाण्यावर आजी आणि नात थिरकताना दिसतायत. या गाण्यात आजीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे; तर अदा टी-शर्ट आणि शॉट्स घालून भिंतीमागे लपून डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने मराठीत कॅप्शन दिली आहे. “द केरला स्टोरी, सनफ्लॉवर २, बस्तर यातला तुमचा आवडता चित्रपट कोणता आहे? आणि माझा कोणता आवडता आहे याचा अंदाज तुम्ही लावा.”

हेही वाचा… VIDEO: होळीनिमित्त ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी शेअर केला खास व्हिडीओ, चाहते म्हणाले, “वयाचा विसर पडेल…”

आजीबद्दल कॅप्शनमध्ये लिहिताना अदा म्हणाली, “ज्यांना माहीत नाही, त्यांच्यासाठी सांगते की ही माझी आजी आहे- माझ्या खऱ्या आयुष्यातील हीरो”

अदा आणि आजीचा हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांनी कमेंट करीत अदा आणि आजीच्या डान्सचे कौतुक केले आहे. एकाने कमेंट करीत लिहिले, “हिंदी चित्रपट खूप झाले. आता मराठीमध्ये एकदा येऊन तर पाहा. पुन्हा कुठे जाणार नाही.” यावर अदाने “नक्की” असा रिप्लाय दिला. तर दुसऱ्याने लिहिले, “वाह! आजीची ऊर्जा बघा; ती वाटतच नाही की, ती ९० वर्षांची आहे.”

हेही वाचा… “लीक कर दू क्या”; बॉबी देओलकडे आहे धोनीचा ‘हा’ व्हिडीओ, क्रिकेटर विनंती करत म्हणाला, “तो व्हिडीओ…”

दरम्यान, अदाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, अदाचा ‘बस्तर- द नक्षल स्टोरी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. ‘सनफ्लॉवर-२’ या वेब सीरिजमध्येही अदा सुनील ग्रोव्हरबरोबर झळकली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adah sharma grandmother marathi dance video on gulabi saree went viral dvr