‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा नुकतीच तिचं घर सोडून एका दुसऱ्या घरात स्थायिक झाली आहे. अदा तिच्या आई आणि आजीबरोबर आता वांद्रे येथील एका भव्य फ्लॅटमध्ये राहणार आहे. या घराचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी संबंध आहे. वांद्रे येथील या घरात आधी सुशांत राहायचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अदा शर्मा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वांद्रे येथील पूर्वीच्या निवासस्थानी राहायला गेल्याचे वृत्त नुकतंच समोर आलंय. काही महिन्यांनंतर आता अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला आहे. अदा तिच्या आई आणि आजीबरोबर या घरात शिफ्ट झाली आहे. तीन वर्षांपासून बंद असलेलं हे घर अखेर अदा शर्माने पाच वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट करत भाड्याने घेतलं आहे.

हेही वाचा… सुजलेला चेहरा, बोटॉक्स अन्.., दर दुसऱ्या दिवशी उर्फीला होते अ‍ॅलर्जी, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली, “मला फक्त सहानुभूती…”

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अदा शर्माने सांगितलं की, ती चार महिन्यांपूर्वी फ्लॅटमध्ये (मॉन्ट ब्लँक अपार्टमेंट्स, वांद्रे) राहायला गेली आहे. ती ‘बस्तर’ आणि ‘द केरला स्टोरी’च्या ओटीटी रीलिजसह तिच्या बाकीच्या प्रोजेक्ट्सच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होती. त्यानंतर ती मथुरा येथील हत्ती अभयारण्यात काही काळ फिरण्यासाठी गेली होती, त्यामुळे आता कुठे तिला थोडा वेळ मिळाला आणि म्हणून ती या घरी स्थायिक झाली.

पाली हिलमधील एकाच घरात आयुष्यभर राहिलेली अदा पहिल्यांदाच घराबाहेर पडलीय. ती म्हणाली, “मी वाईब्सबद्दल (Vibes) खूप संवेदनशील आहे आणि हे ठिकाण मला सकारात्मक वाईब देतं. केरळ आणि मुंबईतील आमची घरे झाडांनी वेढलेली आहेत आणि आम्ही तिकडे पक्ष्यांना आणि खारुताईला खायला घालायचो. त्यामुळे मला एक चांगलं दृश्य असलेलं घर आणि पक्ष्यांना खायला द्यायला एक पुरेशी जागा हवी होती.”

हेही वाचा… “लग्नानंतर कोणी प्रपोज केलं आहे का?” ऐश्वर्या नारकर यांनी चाहत्याच्या ‘त्या’ प्रश्नावर दिलं ‘असं’ उत्तर; म्हणाल्या, “सगळ्यांना…”

अदाने या घरी आल्यानंतर तिच्याप्रमाणे काही बदलदेखील केले आहेत. बॉम्बे टाईम्सच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने तिचा संपूर्ण फ्लॅट पांढऱ्या रंगाने रंगवला आहे आणि पहिल्या मजल्यावर मंदिर उभारलं आहे. तर वरच्या मजल्यावरील एका खोलीचं रुपांतर तिने म्युझिक रुममध्ये केलं आहे. अदाने अपार्टमेंटमधील एक खोली डान्स स्टुडिओसाठी तयार केली आहे. तिने टेरेस एका बागेत बदलला आहे, जिथे तिने तिच्या आधीच्या घरातील सर्व रोपे लावली आहेत.

अदाने घेतलेलं हे घर पूर्वी सुशांत सिंह राजपूतने भाड्याने घेतलं होतं. २०२० रोजी याच घराच्या एका खोलीत सुशांतचा गळफास लावलेला मृतदेह आढळला होता, तेव्हापासून हे घर रिकामे होते. २०१९ रोजी सुशांतने हे घर भाडेतत्वावर घेतलं होतं. दरमहा ४.५ लाख रुपये असं भाडं तेव्हा सुशांत द्यायचा. हा एक डुप्लेक्स फ्लॅट आहे, जो ३६०० चौरस फूट इतका आहे. खालच्या मजल्यावर एक मोठा हॉल आहे आणि वरच्या मजल्यावर तीन बेडरूम आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adah sharma shifted to actor sushant singh rajput house in bandra dvr