विपुल अमृतलाल शाह, सुदीप्तो सेन व अदा शर्मा हे तिघे पुन्हा एकदा एकत्र आणखी एक धाडसी विषयावर बेतलेला चित्रपट लवकरच घेऊन आपल्यासमोर येणार आहेत. ‘द केरला स्टोरी’नंतर लगेचच काही दिवसात सुदीप्तो सेन यांनी आगामी ‘बस्तर’ या चित्रपटाची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची पोस्टर्स अदा शर्माने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली होती. त्यानंतर अदाने याचा पहिला टीझरही शेअर केला होता.

आता याच चित्रपटाचा दूसरा टीझरदेखील समोर आला आहे. या चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत असून ती आयपीएस अधिकारी नीरजा माधवन यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. पहिल्या टीझरमध्ये पाकिस्ताबरोबर युद्धात शहिद झालेले आपले जवान आणि आपल्याच देशात नक्षलवादी लोकांनी केलेली आपल्या जवानांची हत्या अन् जेएनयुसारख्या विद्यापीठात त्या कृतीचं सेलिब्रेशन अशा बऱ्याच गोष्टींबद्दल अदा शर्मा भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळाली.

Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
Rupali Ganguly
Video: “खोटं बोलून करिअर…”, ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे आरोप; ईशा वर्माचा वडिलांवरही संताप
savlyachi janu savali fame megha dhade gift to veena jagtap
Video: ‘सावळ्याची जणू सावली’मधील वीणा जगतापला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने दिलं सुंदर गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझी मोठी समस्या…”
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…

आणखी वाचा : अर्जुन कपूरच ‘सिंघम ३’चा खलनायक; धडकी भरवणारा अभिनेत्याचा फर्स्ट लूक चर्चेत

तर आता दुसऱ्या टीझरमध्ये एक पीडित महिला तिची व्यथा मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रत्ना कश्यप ही महिला तिच्यावर नक्षलवादी लोकांकडून झालेल्या अन्यायाबद्दल आपल्याला सांगताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर बस्तरमध्ये तिरंगा फडकावणं हा गुन्हा आहे आणि तसं केल्यास फार वाईट शिक्षा आहे ती म्हणजे मृत्यू असं त्या महिलेच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. ‘बस्तर’ च्या कित्येक महिलांना आईला या संकटाचा सामना करावा लागला आहे हेदेखील या टीझरमध्ये स्पष्ट होत आहे.

एका आईच्या तोंडून तिची ही हृदयद्रावक कहाणी या टीझरमधून आपल्यासमोर आलेली आहे. ‘द केरला स्टोरी’प्रमाणेच या चित्रपटातही निर्माते व दिग्दर्शक बऱ्याच गोष्टींचा दावा करताना दिसत आहेत. डाव्या वामपंथी लोकांची अन् त्यांच्या छुप्या अजेंड्याची पोलखोल या चित्रपटातून करण्यात येणार आहे असा दावाही याच्या निर्मात्यांनी टीझरमधून केला आहे. ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’चे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनीच केले आहे अन् विपुल शाह यांनी त्याची निर्मिती केली आहे.