‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करीत २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतल्याने अदाने आपल्या चाहत्यांचे आभार मानले होते. गेल्या काही दिवसांत चित्रपटाच्या निमित्ताने अदाने अनेक ठिकाणी मुलाखतींसाठी हजेरी लावली होती. यादरम्यान अभिनेत्रीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत.

हेही वाचा : सुपरहिट मालिका अन् दीपिका पदुकोणबरोबर केलं होतं काम, अवघ्या ३२ व्या वर्षी अपघाती जीव गमावणारी वैभवी उपाध्याय कोण होती?

Abhishek Gaonkar and Sonalee Gurav
“माझ्या वडिलांचा विरोध…”, सोनाली अन् अभिषेक गावकरने सांगितला लव्ह स्टोरीचा रंजक किस्सा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
amazing magic of the students of the Zilla Parishad school
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील अशिक्षित अधिपतीचं खऱ्या आयुष्यात किती शिक्षण झालंय माहितेय का?
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री अदा शर्माने ‘हॉटरफ्लाय’च्या ‘ये लडकी पागल है’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या वेळी अदाने ती मुलांना इम्प्रेस (Impress) करण्यासाठी काय करते याबाबत खुलासा केला आहे. अदा म्हणाली, “मी मुलांना इम्प्रेस करण्यासाठी सायन्समधील पीरियॉडिक टेबल (Periodic Table) म्हणून दाखवते, परंतु माझे टेबल ऐकून मुलं खरंच इम्प्रेस होतात की नाही याबाबत मला कल्पना नाही.” यावर मुलाखतकार म्हणते, “अदा, आता टेबल म्हणून दाखवतेय. जर कोणत्याही मुलाला आवडले तर कृपया कमेंट्समध्ये तुम्ही इम्प्रेस झाला आहात अशा प्रतिक्रिया द्या.”

हेही वाचा : “मला चित्रपट मिळत नव्हते…” बॉलीवूडमधील संघर्षाबाबत क्रिती सेनॉनचे मोठे वक्तव्य

अभिनेत्रीने सांगितल्याप्रमाणे सायन्समधील पीरियॉडिक टेबल ती हुबेहूब तिच्या कवितेच्या शैलीत म्हणून दाखवते. खरेतर सायन्सचे हे टेबल पाठ करणे भल्याभल्या लोकांना शक्य होत नाही. अदाने न थांबता, न चुकता टेबल म्हटल्याने सगळ्यांनीच कमेंट सेक्शनमध्ये आश्चर्य व्यक्त केले आहे.

हेही वाचा : Video : पापाराझींनी फोटोसाठी थांबवल्यावर अनुष्का शर्माने स्पष्टच सांगितले, म्हणाली, “बच्चा साथ में…”

‘द केरला स्टोरी’ चित्रपटातील तिची सहकलाकार योगिता बिहानीनेसुद्धा तिच्या या व्हिडीओवर कमेंट करीत, “हे फक्त तूच करू शकतेस,” असे म्हटले आहे. तसेच अनेक युजर्सनी, “ही मुलगी बॉलीवूडचे खरे टॅलेंट आहे. सगळ्या गोष्टींत अदा परफेक्ट आहे…” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, अदा शर्मा मुख्य भूमिकेत असलेल्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने अवघ्या १८ दिवसांमध्ये २०० कोटींचा गल्ला जमवला आहे.

Story img Loader