‘द केरला स्टोरी’ चित्रपटातील जबरदस्त अभिनयामुळे अभिनेत्री अदा शर्मा चर्चेत आली. या चित्रपटासाठी अदाला अनेक पुरस्कारदेखील जाहीर झाले आहेत. अदा अभिनयासह आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अनेकदा अदाने तिच्या नानीचा म्हणजेच आजीचा उल्लेख केला आहे. ‘गुलाबी साडी’ या मराठमोळ्या गाण्यावर नात अदा आणि तिच्या आजीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. अशातच अदाचा आजीशी कनेक्ट असणारा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज अदाने खास तिच्या आजीची साडी नेसली होती. आजीची साडी नेसायची अदाची ही काही पहिलीच वेळ नाही. पण, विशेष गोष्ट म्हणजे या साडीची किंमत फक्त १५ रुपये आहे असं ती म्हणाली. पापाराझींसमोर पोज देताना जेव्हा एकाने अदाला विचारलं, “या साडीची किंमत काय आहे?” तेव्हा अदा म्हणाली, “या साडीची किंमत १५ रुपये आहे. या किमतीबद्दल आजीने मला सांगितलं होतं आणि त्याचा माझ्याकडे व्हिडीओसुद्धा आहे.”

पापाराझीने अदाचं कौतुक केलं आणि म्हणाला, “तुम्ही या साडीत खूप सुंदर दिसताय.” यावर अदा म्हणाली, “थॅंक्स, ही खूप वर्षे जुनी असलेली साडी माझ्या आजीची आहे. याची किंमत जरी १५ रुपये असली तरी ही आजीची साडी असल्याने कोणीच याची किंमत करू शकत नाही, माझ्यासाठी तरी या साडीचं मोल खूप जास्त आहे.”

हेही वाचा… “अस्तिकाचा वध नेत्राच्या हातून…”; ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या दिग्दर्शकांनी केला खुलासा

अदाने नेसलेली साडी केशरी रंगाची होती, ज्यावर सफेद आणि राखाडी रंगाची फ्लॉवर प्रिंट होती. यावर अदाने काळ्या रंगाचा मल्टीकलर पफ स्ल्हीव्ज ब्लाऊज घातला होता. अदाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अदाच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले, “सनफ्लॉवर, तू खूप सुंदर दिसतेस.” तर दुसऱ्याने लिहिले, “अदा एखाद्या अप्सरेसारखी दिसतेय.” अदाने याआधी आजीची ६५ वर्षे जुनी साडीदेखील नेसली होती.

हेही वाचा… “काश मैं लडका होता” असं ऋतुजा बागवे गौरी नलावडेचा फोटो पाहून का म्हणाली?

दरम्यान, अदाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर १५ मार्च रोजी प्रदर्शित झालेला ‘बस्तर- द नक्षल स्टोरी’ चित्रपटात अदाने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तेवढी चांगली कमाई करू शकला नाही. परंतु, अनेक कलाकारांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. १ मार्च रोजी झी ५ वर प्रदर्शित झालेल्या ‘सनफ्लॉवर २’ या सीरिजमध्ये अदाने मुख्य भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adah sharma wore 15 rupees saree of her nani video viral dvr