राखी सावंत सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे भलतीच चर्चेत आली आहे. राखीने पती आदिल खान विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता याबाबतच एक नवी माहिती समोर आली आहे. आदिलला अंधेरी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावर राखीने आता पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – दुसऱ्याच मुलीबरोबर अफेअर ते मारहाणीचे आरोप, राखी सावंतच्या नवऱ्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

काही दिवसांपूर्वीच राखीने आदिलबरोबर लग्न केलं असल्याचं सोशल मीडियाद्वारे फोटो पोस्ट करत सांगितलं. त्यानंतरच या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. आदिलला लग्न लपवून ठेवायचं होतं असं राखीने यादरम्यान सांगितलं होतं. शिवाय या दोघांनी जवळपास सात महिने लग्न सगळ्यांपासून लपवून ठेवलं.

आता आदिलला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राखीने पुन्हा एकदा पतीबाबत भाष्य केलं आहे. राखी तिच्या वकिलांना भेटायला जात असताना तिला पापाराझी छायाचित्रकारांनी घेरलं. यावेळी तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे असं पापाराझी छायाचित्रकार राखीला म्हणाले. यावेळी राखीने आदिलच्या पहिल्या लग्नाच्या लग्न पत्रिकेबाबत सांगितलं.

आणखी वाचा – Video : …अन् बोलता बोलता जमिनीवर कोसळली राखी सावंत, पती आदिल खानच्या अटकेनंतर अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

राखी म्हणाली, “मला आनंद झालेला नाही. पण आदिलल्या पहिल्या लग्नाची लग्नपत्रिका माझ्याकडे आली आहे. तसेच त्याच्या घटस्फोटाचे कागद पत्रही माझ्या हाती आहेत. माझा एवढा विश्वासघात त्याने केला आहे. मला आधी माझ्या वकिलांना भेटायचं आहे.” राखी व आदिलच्या वादाला कोणती नवी दिशा मिळणार हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adil khan durrani arrested his judicial custody for 14 days rakhi sawant first reaction see details kmd