‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी सावंतने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. राखीने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी लग्न केल्याची माहिती सर्वांना दिली आहे. तसेच तिने तिच्या निकाहनाम्याचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आदिलने आपल्याला लग्न लपवण्यास सांगितलं होतं, असंही राखीने म्हटलं आहे. मागच्या दोन दिवसांपासून राखीच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. पण, लग्नाच्या वृत्तांवर फक्त राखीचीच प्रतिक्रिया आली होती. अशातच आता आदिल खाननेही लग्नाबद्दलच्या बातम्यांवर मौन सोडलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राखी सावंतने लग्नाच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंवर सोडलं मौन; सत्य सांगत म्हणाली, “मी खूप…”

या सर्व दाव्यांवर सध्या काहीही बोलायचे नाही, असे आदिल खानने एका मुलाखतीत सांगितलं आहे. त्याने याबाबत बोलण्यासाठी १०-१२ दिवसांचा वेळ मागितला आहे. आपल्याला सध्या १०-१२ दिवस वेळ पाहिजे आणि नंतर आपण लग्नाबद्दल बोलणार, असं तो म्हणाला. विशेष म्हणजे राखी सावंत स्वतः या मुलाखतीचे शूटिंग करत होती. अशातच राखीने पुन्हा एकदा तिच्या लग्नाबद्दल सांगितलंय.

‘नवभारत टाइम्स’शी बोलताना राखी सावंत म्हणाली की, “मी लग्नाचे सर्व पुरावे समोर ठेवले आहेत. आदिल आताही माझ्याबरोबर आहे. मी आदिलशी लग्न केलं आहे. मी सर्व पुरावे मीडियाला दिले आहेत. माझ्या आयुष्यात भूकंप झाला आहे आणि आता काहीतरी वेगळं घडतंय. म्हणूनच मी सगळ्यांना सांगतेय की ७ महिन्यांपूर्वी मी आदिल खानशी लग्न केलं आहे. आदिल या लग्नाला का नाकारतोय याचा मला स्वतःला धक्का बसला आहे. मी खूप अस्वस्थ आहे. माझी आई आजारी आहे,” असं ती यावेळी म्हणाली.

राखी सावंतला वाटतेय लव्ह जिहादची भीती, म्हणाली “आदिलचे कुटुंबीय…”

आदिलशी काय बोलणं झालं, यावर राखी म्हणाली, “आदिल अजूनही माझ्यासोबत आहे. आम्ही एकत्र राहत आहोत. आम्ही नवरा-बायकोसारखं आयुष्य जगत आहोत. तो कोणत्या कारणामुळे लग्न नाकारत आहे हे मला माहीत नाही. सध्या आदिल वेळ मागत आहेत. तो माझा नवरा आहे आणि तो माझ्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. पण आता आदिलला सर्वकाही व्यवस्थित करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adil khan durrani first reaction on wedding with rakhi sawant hrc