अभिनेत्री राखी सावंतच्या संसारात वादळ आलं आहे. राखी वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पती आदिल खानचं अफेअर असल्याचा खुलासा राखीने केला होता. राखीने तक्रार दाखल केल्यानंतर आदिलला पोलिसांनी ७ फेब्रुवारीला अटक केली होती. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राखीने कॅमेऱ्यासमोर आदिलची गर्लफ्रेंड असल्याचं उघड केलं होतं. तिने आदिलच्या गर्लफ्रेंडचं नावही मीडियासमोर जाहीर केलं होतं. या प्रकरणानंतर आदिल खानची गर्लफ्रेंड तनु चंडेल पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली आहे. तनुचा एक व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. तनुने आदिल खान प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा>> कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ शाहरुख खानच्या ‘पठाण’ला देणार टक्कर? प्रदर्शनापूर्वीच ‘इतक्या’ कोटींची कमाई

तनु म्हणाली, “याबाबत मी आता काही बोललं पाहिजे, मला वाटतं नाही. जेव्हा मला या प्रकरणावर बोलावसं वाटेल, तेव्हा स्वत: मी कॅमेऱ्यासमोर येऊन प्रतिक्रिया देईन”. तनुला राखी सावंतने केलेल्या आरोपांबाबत विचारताच ती म्हणाली, “तुम्ही लोकांना कितीही काही सांगितलं, तरी ते त्यांच्याप्रमाणेच विचार करणार. तिला जे बोलायचं आहे ते बोलू दे. मी त्याच्यावर काहीही बोलणार नाही. ती जे बोलत आहे, ते तिच्यासाठी चांगलं आहे”.

हेही वाचा>> “रितेशपासून दूर राहा” पहिल्या पतीबाबत कमेंट करणाऱ्याला राखी सावंतचं उत्तर, म्हणाली “तो माझा…”

दरम्यान, राखीने तनु व आदिलचं अफेअर असल्याचं उघड केल्यानंतर त्यांचं लग्नही झाल्याचं म्हटलं आहे. याशिवाय तनु गरोदर असल्याचंही राखीचं म्हणणं आहे. गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरुन आदिलने मला मारहाण केल्याचा आरोपही राखीने केला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adil khan gf tanu chandel on rakhi sawant video viral kak