राखी सावंत गेले काही दिवस सातत्याने पती आदिल खान दुर्रानीवर गंभीर आरोप करत आहे. दरम्यान तिने आदिल विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आदिलला अंधेरी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. आता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावर आदिलच्या वकिलांनी त्याच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.
आणखी वाचा – दुसऱ्याच मुलीबरोबर अफेअर ते मारहाणीचे आरोप, राखी सावंतच्या नवऱ्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आदिल खानचे वकील काय म्हणाले?
‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार आदिलच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, “आदिलने पैश्यांची फसवणूक केली अशी तक्रार सुरुवातीला राखीने केली. राखीच्या घरी आदिल त्याचे कपडे आणायला गेला. तेव्हा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिस तपासामध्ये आदिलने पैश्यांचा संपूर्ण हिशोब दिला आहे. शिवाय त्याने स्वतः खूप पैसे खर्च केले असल्याचं यावेळी पोलिसांना सांगितलं.”
आणखी वाचा – Video : …अन् बोलता बोलता जमिनीवर कोसळली राखी सावंत, पती आदिल खानच्या अटकेनंतर अभिनेत्रीची झाली अशी अवस्था
“त्यानंतर पुन्हा पोलिस ठाण्यात जाऊन राखीने मारहाणीसारखे गंभीर आरोप आदिलवर केले. पण हे सगळे आरोप खोटे आहेत. आदिल दोषी नाही. आदिलला प्लॅन करून यामध्ये फसवलं जात आहे. आदिल व राखीचं बँकमध्ये एक जॉइंट अकाऊंट आहे. व्यवसायासाठी हे दोघं त्या अकाऊंटचा वापर करतात.”
पुढे आदिलचे वकील म्हणाले, “जेव्हा या अकाऊंटचा वापर होतो तेव्हा तीन डिजिटचा पीन नंबर राखी व आदिलच्या फोनवर येतो. अशामध्येच पैसे खर्च करण्याचा आरोप करणं मला व्यर्थ वाटतं. आम्ही पोलिसांना बँक अकाऊंटची संपूर्ण माहिती दिली आहे.” राखीने केलेले आरोप चुकीचे असल्याचं आदिलच्या वकिलांचं म्हणणं आहे.