राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. राखीच्या संसारात वादळ आलं आहे. गेले काही दिवस राखी कॅमेऱ्यासमोर येऊन पती आदिल खानवर आरोप करत आहे. राखीने आदिलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ओशिवारा पोलिसांना मंगळवारी (७ फेब्रुवारी) त्याला अटक केली. आता आदिलला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आदिलला न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन आदिल व राखीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आदिल राखीच्या गाड्यांबद्दल माहिती सांगत आहे. “राखीकडे सहा गाड्या आहेत. बीएमडब्ल्यू, वोल्वो, मर्सिडीज ए क्लास, बीएमडब्ल्यू एक्स फाइव्ह, लंडन ३५०, मर्सिडीज बेंन्झ सी क्लास .या सहा गाड्या राखीच्या आहेत”, असं आदिल म्हणाला आहे. या गाड्यांचे कागदपत्र कोणाकडे आहेत, याबाबत आदिलने व्हिडीओत माहिती दिली आहे.
हेही वाचा>> Video: सिद्धार्थ-कियाराने लग्नानंतर वाटली मिठाई; अभिनेत्रीच्या साध्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष
हेही पाहा>> Photos: अटक झालेला राखी सावंतचा पती तिच्यापेक्षा १७ वर्षांनी लहान, जाणून घ्या आदिल खानची एकूण संपत्ती
“राखीने मला दीड करोड दिले आहेत. या गाड्यांमधून होणारा १० लाख, २० लाख रुपयांचा नफा राखीला दिला जाणार आहे. राखीला मिळणाऱ्या पैशांमध्ये एक रुपयाची फरक नसतो. सगळे पैसे राखीचे आहेत.हा एक मिनिट दोन सेकंदाचा व्हिडीओ मी माझ्या फोनमधून राखीला पाठवत आहे”, असंही आदिल पुढे म्हणाला आहे. हा व्हिडीओ एका हॉटेलमध्ये शूट करण्यात आला असल्याचा अंदाज आहे. पुढे या व्हिडीओत राखीही बसलेली दिसत आहे.
हेही वाचा>> राखी सावंतच्या वकिलाचे आदिल खानवर गंभीर आरोप, म्हणाले “तिचे व्हिडीओ बनवून…”
राखी व आदिलने मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर त्यांनी निकाहही केला होता. सात महिन्यांनंतर राखीने तिच्या लग्नाबाबत खुलासा केला होता. अनेक दिवसांच्या ड्रामानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं. त्यानंतर राखीने आदिलचं अफेअर सुरू असल्याचा खुलासा केला होता. मारहाण, फसवणूक व पैशाचा घोटाळा केल्याचा आरोप राखीने केला आहे.