२ ऑक्टोबर रोजी दाक्षिणात्य अभिनेता प्रभासाचा बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला. या टिझरच्या प्रदर्शनासाठी भव्यदिव्य कार्य्रक्रमाचे आयोजन अयोध्येमध्ये करण्यात आले होते. चित्रपटाचा टिझर युट्यूबवर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर टिझरला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. चित्रपटातील व्हीएफएक्स, सैफ अली खानने साकारलेल पात्र यावरून सोशल मीडियावर आता मिम्स फिरू लागले आहेत. मात्र चित्रपटातील कलाकार टिझर प्रदर्शित होण्याआधी भावुक झाले होते.

टिझर प्रदर्शित होण्याआधी अभिनेत्री क्रिती सॅनॉन माध्यमांशी संवाद साधताना म्हणाली, ‘मी स्वतःला खूप भाग्यवान समजते खूप कमी अभिनेत्रींना अशा प्रकारच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळते. माझ्या आयुष्यात मला ही भूमिका खूप लवकर मिळाली आहे. मला आठवतंय चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी मी खूप भावुक झाले होते. मला या चित्रपटातून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती, माझ्यासाठी हा स्वप्नवत अनुभव आहे. मी आशा करते मी तुम्हाला निराश करणार नाही, माझी भूमिका तुम्हाला नक्की आवडेल’. अशा शब्दात तिने आपली प्रतिक्रिया दिली. प्रभासनेदेखील आपली प्रतिक्रिया दिली होती तो म्हणाला होता ‘मी हा चित्रपट करताना खूप घाबरलो होतो’.

“आम्ही चित्रपटासाठी कोणतेही… ” ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे व्हीएफएक्स करणाऱ्या कंपनीने केला खुलासा

‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणावर बेतलेला असून या चित्रपटाचं बजेट ५०० कोटी असल्याची चर्चा बाहेर चांगलीच रंगली आहे. या चित्रपटावर संपूर्ण टीमने मेहनत घेतली आहे. करोना महामारीमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण रखडले होते. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात प्रभासच्या व्यतिरिक्त क्रिती सेनॉन ही जानकीच्या आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत. मराठमोळा देवदत्त नागे देखील या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण पात्र साकारले आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार, राजेश नायर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. पुढच्या वर्षी १२ जानेवारीला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader