सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘आदिपुरुष’ चित्रपट आणि त्यातील व्हीएफएक्स, या चित्रपटात प्रभास,सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत, सैफच्या लूकचीदेखील खिल्ली उडवली जात आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाची घोषणा झाली तेव्हाच निर्मात्यांनी सांगितले होते ‘हा चित्रपट भव्यदिव्य असणार आहे’. चित्रपटाच्या टीझरला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे चित्रपटाच्या व्हीएफएक्सबाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्या कंपनीच नाव या चित्रपटातील व्हीएफएक्स दिले आहेत त्या कंपनीने या गोष्टीला नकार दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. व्हीएफएक्स कंपनीने म्हंटले आहे की ‘NY VFXwaala हे स्पष्ट करत आहे की आम्ही आदिपुरुष चित्रपटासाठी कोणतेही स्पेशल cgi इफेक्ट्स दिलेले नाहीत. माध्यमातील काही लोकांनी आमच्याकडे ही विचारणा केली म्हणून आम्ही हे अधिकृतपणे घोषित करत आहोत’. याबतीत नेमका काय प्रकार आहे हे काही दिवसात समोर येईलच, मात्र व्हीएफएक्सवरून चित्रपटाला चांगलाच टीकेचा सामना करावा लागत आहे. ही कंपनी २०१५ पासून कार्यरत आहे. अभिनेता अजय देवगण याने पुढाकार घेऊन ही कंपनी सुरु केली आहे.

विवेक अग्निहोत्रींनी मुंबईत खरेदी केले नवे आलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

दरम्यान २ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा टिझर अयोध्यामध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटातील कलाकार प्रभास, क्रिती सॅनॉन, दिग्दर्शक ओम राऊत चित्रपटाचे निर्माते या सोहळ्याला हजर होते. दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा दुसरा हिंदी, तर पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे. त्यांनी याआधी अजय देवगनसह ‘तान्हाजी’ हा चित्रपट बनवला होता.

या चित्रपटात प्रभासच्या प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत तर क्रिती सेनॉन ही जानकीच्या आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत. मराठमोळा देवदत्त नागे देखील या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण पात्र साकारले आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार, राजेश नायर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. पुढच्या वर्षी १२ जानेवारीला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adipursh film update vfx company vfx wala taken distance itself from the film spg