‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असतानाच काल (६ जून) चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तासाभरातच या ट्रेलरला लाखांच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. या नव्या ट्रेलरमध्ये सीताहरणचा सीन दाखवण्यात आला आहे. हा ट्रेलर बघून अनेक चाहते सैफ अली खानने साकारलेल्या रावणाच्या भूमिकेचं कौतुक करत आहेत.

सैफचं कौतुक करत एका चाहत्याने लिहिलं, “ओएमजी, नकारात्मक भूमिकेत सैफ अली खान छान दिसत आहे. ‘तान्हाजी’मधील उदयभानसारखी दिग्दर्शक ओम राऊत आणि सैफ अली खान उत्तम कॉम्बो आहेत. टीमला शुभेच्छा.” आणखी एका युजरने सैफचे कौतुक करणारा फायर इमोजी पोस्ट केला आहे.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका

दोन दिवसांपूर्वी ‘आदिपुरुष’चा नवीन ॲक्शन ट्रेलर येणार अशी घोषणा करण्यात आली होती. तिरुपती येथे हा ट्रेलर प्रदर्शित करण्यासाठी एका भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रभासने साकारलेल्या रामाच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. तर आता दुसरीकडे अनेक युजर सैफने साकारलेल्या लंकापती रावणाच्या भूमिकेचं कौतुक करत आहेत.

सीतेच्या भूमिकेतील क्रिती सेनॉनचे कौतुक

लंकेशच्या भूमिकेतील सैफ आणि सीतेच्या भूमिकेतील क्रिती सेनॉनचेही खूप कौतुक केले जात आहे. एका युजरने लिहिले की, “मला आदिपुरुष चित्रपटाबाबत आवडलेली सगळ्यात जास्त गोष्ट म्हणजे सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि चित्रपटाला देण्यात आलेलं संगीत. सैफ रावणाच्या भूमिकेत शकुनी किंवा दुष्ट जादूगारसारखा दिसतो,” अशी कमेंट करण्यात आली आहे.

‘आदिपुरुष’ १६ जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत चांगली उत्सुकता पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत ४०० कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट किती विक्रम मोडतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.