अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या तिच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. १६ जूनला प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत चांगली कमाई करीत जगभरात २१४ कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतात सुद्धा हा चित्रपट लवकरच २०० कोटींची कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘आदिपुरुष’नंतर क्रिती सेनॉन लवकरच शाहिद कपूरबरोबर एका नव्या चित्रपटात झळकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video : करण देओलच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-दीपिकाने केला जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

आगामी चित्रपटाच्या निमित्ताने शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन ही नवी ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, निर्मात्यांनी या रोमॅंटिक चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. शाहिद- क्रिती सेनॉनचा हा आगामी रोमॅंटिक चित्रपट वर्षाखेरीस प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : “प्रिय, बाबा तू कायम…” ‘फादर्स डे’ निमित्त जिनिलीयाने शेअर केली भावुक पोस्ट, रितेश देशमुख कमेंट करीत म्हणाला…

जियो स्टुडिओजने या चित्रपटाच्या रिलीज तारखेची घोषणा केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “प्रेक्षकांच्या भेटीला आम्ही ७ डिसेंबर २०२३ रोजी एक अविस्मरणीय लव्हस्टोरी घेऊन येत आहोत.” चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नसून याचे लेखन दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले असून, दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि लक्ष्मण उतेकर या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

रिलीज डेटची घोषणा करीत निर्मात्यांनी शाहिद आणि क्रितीचा बाईकवर बसलेला रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. दरम्यान, शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’ हा चित्रपट अलीकडेच ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. ‘ब्लडी डॅडी’मध्ये हटके भूमिका साकारुन शाहिदने त्याच्या चाहत्यांचे मन जिंकले. २००३ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर शाहिदने अनेक रोमॅंटिक चित्रपट केले आहेत. तसेच अभिनेत्री क्रिती सेनॉनने ‘आदिपुरुष’ चित्रपटात सीतेची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adipurush actress kriti sanon to star in new romantic film with this bollywood actor sva 00
Show comments