ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने प्रभू श्रीरामाची, तर अभिनेत्री क्रिती सेनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून याचदरम्यान अभिनेत्री क्रिती सेनॉनने चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : आलिया-रणवीरच्या ‘रॉकी और रानी…’चा टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज; ‘आदिपुरुष’ची लोकप्रियता पाहून करण जोहरचा मोठा निर्णय

poonam panday visits mahakumbh mauni amavasya
Video : “माझी सर्व पापं धुतली गेली”, पूनम पांडेने मौनी अमावस्येला गंगेत केले स्नान; महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल म्हणाली…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shocking video of Thief snatches phone from young girls hand drags her on street Ludhiana video viral on social media
एका चोरीसाठी अक्षरश: तिच्या जीवाशी खेळला! तरुणीच्या हातातून फोन खेचला, तिला रस्त्यावरून फरफटत नेलं अन्…, VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
govinda
“तू स्वत:च तर…”, गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता आहुजाने विचारलेले ‘हे’ प्रश्न; खुलासा करत म्हणाली, “मला भीती…”
when mamta kulkarni had fight with ameesha patel
“स्टार कोण? तू की मी?” ममता कुलकर्णीने भर पार्टीत केलेली शिवीगाळ, मध्यस्थी करणाऱ्या ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीला…
Marathi actress Tejashri Pradhan talk about social media
“फक्त हे मृगजळासारखं…”, सोशल मीडियाबाबत तेजश्री प्रधानने मांडलं मत; तरुणपिढीला सल्ला देत म्हणाली, “आपण आयुष्यात…”
Kshitee Jog
क्षिती जोगने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका का सोडलेली? अभिनेत्री म्हणाली, “खूप चुकतंय…”
Fight video Woman abuses and beat ola cab driver for missing her flight at mumbai airport viral video
“तिची हिंमत कशी झाली…” आधी शिवीगाळ मग लाथा-बुक्क्यांनी मारहाण, फ्लाइट चुकली म्हणून महिलेने कॅबचालकाला दिला चोप, संतापजनक VIDEO व्हायरल

क्रिती सेनॉनने सीता मातेच्या भूमिकेतील फोटो शेअर करून त्याला “सीता मॉं, माय जानकी” असे कॅप्शन दिले आहे. अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. क्रितीने शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करीत अनेकांनी तिला “कृपया स्वत:ची तुलना सीता मातेबरोबर करून नकोस” असे सांगितले आहे.

हेही वाचा : ‘द आर्चीज’: एकाच चित्रपटातून पदार्पण करणार ३ स्टारकिड्स; नेटकरी म्हणाले “पुन्हा नेपोटीजम…”

अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या फोटोवर कमेंट करीत एका युजरने लिहिले की, “सीता माता महान आहे तिचे पात्र तुला शोभत सुद्धा नाही”, तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे “रामायणातील पाच श्लोक सुद्धा तुला येत नसतील.” दरम्यान, क्रितीने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोमध्ये क्रितीने चित्रपटात साकारलेल्या सीतेच्या भूमिकेतील फोटो शेअर केला आहे आणि दुसरा फोटो तिच्या आईचा आहे.

‘आदिपुरुष’च्या ॲडव्हान्स बुकिंगला रविवारपासून सुरुवात झाली असून, या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. २४ तासांच्या आत या चित्रपटाची ५० हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधूनच दोन कोटींच्या आसपास कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होणार अशी चिन्हे दिसत आहेत.

Story img Loader