Adipurush Box Office collection Day 11: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होताच चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला. हा चित्रपट १६ जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. सुरुवातीचे तीन दिवस बॉक्स ऑफिसवर धमाल करणाऱ्या या चित्रपटाची चौथ्या दिवसापासून घसरण सुरू झाली ती अद्याप कायम आहे. त्यातल्या त्यात रविवारी २५ जून रोजी चित्रपटाच्या कमाईत थोडी वाढ झालेली पाहायला मिळाली, पण दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाल्याचं दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी थोडीफार कमाईत वाढ झाली असली तरी आता सोमवारचे आकडे समोर आले आहेत अन् ते निराशाजनकच आहेत. दुसऱ्या सोमवारी ‘आदिपुरुष’ने १.७५ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या वीकेंडनंतर कमाईत झालेली सर्वात मोठी घट पाहणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ पाहायला जाताय? ओटीटी वरील हे नवे पर्याय एकदा बघा अन् मगच प्लॅन करा

दुसऱ्या सोमवारची आकडेवारी लक्षात घेता या चित्रपटाचं एकूण कलेक्शन हे २७७.५० कोटी इतकं आहे. ६०० कोटींचं बजेट असलेला हा मेगाबजेट चित्रपट त्याच्या कमाईच्या अर्धी रक्कमसुद्धा अद्याप वसूल करू शकलेला नाही. चित्रपटाला होणारा विरोध अन् बंदीची मागणी याचा याला जबरदस्त फटका बसल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसीएशन’ने गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून या चित्रपटाच्या निर्मात्यांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांची तुलना सुरुवातीला शाहरुख खानच्या ‘पठाण’शी होत होती. आता मात्र चित्रपटाच्या कमाईचा हा वेग पाहता ‘आदिपुरुष’ ३०० कोटींचा आकडाही पार करेल कि नाही ही शंका उपस्थित केली जात आहे. निर्मात्यांनी वादग्रस्त संवाद बदलूनही चित्रपटाला त्याचा फारसा फायदा झालेला नाही. ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास, क्रीती सेनॉन, सैफ अली खान व देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adipurush box office collection day 11 film still struggling to hit 300 crore mark avn