१६ जून रोजी प्रदर्शित झालेल्या बिग बजेट ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या १२ व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार चित्रपट लवकरच सिनेमागृहांमधून हटवला जाईल, असं दिसतंय. चित्रपटाने रिलीजनंतर पहिल्या तीन दिवसांत दमदार कमाई केली होती, ते पाहता तो महिनाभर तर प्रेक्षकांचं मनोरंजन करेल अशी चिन्हे दिसत होती. मात्र चौथ्या दिवसापासून चित्रपटाच्या कमाईला उतरती कळा लागली असून ती आता १२ व्या दिवशीही कायम आहे.

‘गजनी’ फेम असिन पतीपासून घटस्फोट घेणार? अभिनेत्रीने लग्नाचे सर्व फोटो केले डिलीट

Infosys Q3 Results Highlight: Net profit rises 11 percent
इन्फोसिसला ६,८०६ कोटींचा तिमाही नफा; ११ टक्क्यांची अपेक्षेपेक्षा सरस वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Athavale claim chairman of trust running Siddharth college
‘पीपल्स’च्या अध्यक्षपदावर रामदास आठवले यांचा दावा; जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
bmc fixed deposits reduce by 10 thousand crore in current financial year
मुदतठेवींमध्ये १० हजार कोटींची घट; पालिकेचा राखीव निधी ९१ हजार कोटींवरून ८१ हजार कोटींवर
khasdar krida mahotsav, Yashwant Stadium,
नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”
Congress demands Ajit Pawar to provide Rs 2000 crore fund
दोन हजार कोटींचा निधी द्या, काँग्रेसची अजितदादांकडे मागणी!

चित्रपटाच्या निर्मात्यांनी डायलॉग बदलले, इतकंच नव्हे तर तिकीटाचे दरही कमी केले आहेत. फक्त ११२ रुपयांमध्ये हा चित्रपट प्रेक्षक थिएटरमध्ये पाहू शकतात, पण तरीही त्याचा फायदा होताना दिसत नाही. प्रेक्षक चित्रपटाकडे पाठ फिरवत आहेत, हे त्याच्या आकडेवारीवरूनच दिसून येतं. चित्रपटाने १२ व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केली आहे. अवघ्या १२ दिवसांत चित्रपटाने बऱ्याच थिएटर्समधून गाशा गुंडाळला आहे.

’72 Hoorain’ चा ट्रेलर सेन्सॉर बोर्डाने केला रिजेक्ट, संतापलेले निर्माते म्हणाले, “एका मृतदेहाचे…”

‘सॅकनिल्‍क’च्‍या अहवालानुसार, ‘आदिपुरुष’ने रिलीजच्‍या १२व्या दिवशी म्हणजेच दुसर्‍या मंगळवारी १.७५ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे हे आतापर्यंतचे सर्वात कमी कलेक्शन आहे. यासोबतच ‘आदिपुरुष’ची एकूण कमाई आता २७९.६३ कोटी रुपये झाली आहे. तब्बल ६०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट ३०० कोटीच्या क्लबमध्येही सामिल होऊ शकलेला नाही.

“तुझा आणि करीना कपूरचा संबंध काय?” अभिनेत्रीचा ‘ढोबळी’ उल्लेख करत अवधूत गुप्ते म्हणाला, “ती माझ्या…”

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात दाक्षिण्यात सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान व देवदत्त नागे यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी व्हीएफएक्स व त्यातील संवादांमुळे वादात अडकला होता, परिणामी त्याच्या कमाईत घट झाली.

Story img Loader