Adipurush Box Office Collection Day 8: १६ जून रोजी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ चित्रपट अवघ्या एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीचे तीन दिवस दमदार कमाई करणाऱ्या या चित्रटपटाच्या कलेक्शनमध्ये सोमवारपासून घट पाहायला मिळाली होती. घट आठव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारीही कायम राहिली. शुक्रवारी तर चित्रपटाने सर्वात कमी कमाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आदिपुरुष’ला स्पेशल ऑफरचाही फायदा नाहीच! सातव्या दिवसाची आकडेवारी पाहून बसेल धक्का

चित्रपटाच्या घटत्या कमाईमुळे निर्मात्यांनी २२ जून आणि २३ जून या दोन दिवसांसाठी थ्रीडी तिकिटांची किंमत कमी केली होती. ‘आदिपुरुष’ची 3D तिकिटं फक्त १५० रुपयांमध्ये मिळतील, अशी घोषणा करण्यात आली. पण, दोन्ही दिवसांत त्याचा फायदा झाला नाही उलट कमाईत खूप मोठी घट झाली. सातव्या दिवशी साडेपाच कोटींची कमाई करणाऱ्या चित्रटपटाने आठव्या दिवशी अवघ्या साडेतीन कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटाने भारतात आतापर्यंत २६३.४० कोटी रुपये कमावले आहेत.

हेही वाचा – कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत

दरम्यान, पहिल्याच दिवशी चित्रपट नकारात्मक रिव्ह्यू आणि वादग्रस्त संवादामुळे वादात अडकला. नंतर संवादही बदलण्यात आले, पण त्याचा फायदा निर्मात्यांना झाला नाही. पहिल्या दिवशी जगभरात १४० कोटींचा व्यवसाय करणारा हा चित्रपट आता एक आकड्याच्या कमाईवर अडकला आहे. आज आणि उद्या रविवारी वीकेंडमुळे याच्या कलेक्शनमध्ये वाढ होते की नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adipurush box office collection day 8 prabhash film earned 3 crore hrc