ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर यातील संवाद, व्हिएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या लुकवरून देशभरात वाद निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. यानंतर आता ‘आदिपुरुष’चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “मुलींप्रमाणे काही मुलं माझ्या प्रेमात…” भर कार्यक्रमात कार्तिक आर्यनने केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाला…

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी गृहमंत्री अमित शाह यांना हे पत्र लिहिले आहे. ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी संपूर्ण रामायणाची प्रतिमा खराब केल्याचा आणि करोडो हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

हेही वाचा : Video : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाने कुटुंबीयांबरोबर केलं एकत्र लंच; नेटकरी म्हणाले, “दोघांच्या घरी लगीनघाई…”

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल यांनी पत्रात लिहिले आहे की, “हे पत्र १६ जून २०२३ रोजी संपूर्ण भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ नावाच्या चित्रपटाकडे आपले लक्ष वेधण्यासाठी आहे. या चित्रपटामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या असून चित्रपटाची पटकथा आणि संवाद भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्या प्रतिमेला मलिन करणारे आहेत. टी-सीरिज, चित्रपटाचे निर्माते, लेखक मनोज मुंतशीर आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटात दाखवलेली कलाकारांची वेशभूषा, देवाची चुकीची प्रतिमा दर्शवणारी दृश्ये, संवाद यामुळे संपूर्ण हिंदू आणि सनातन धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. आपल्याला माहित असलेले रामायण ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या आवडीनुसार पूर्णपणे बदलले आहे.”

हेही वाचा : Video : “सीतेची भूमिका संपल्यावर पुन्हा असे कपडे…” ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे ‘आदिपुरुष’ फेम क्रिती सेनॉन ट्रोल

पत्रात पुढे म्हटले आहे की, “आम्ही तुम्हाला ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार टी-सिरीज आणि इतर, दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची विनंती करत आहोत.” दरम्यान, १६ जूनला प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ने तीन दिवसात चांगली कमाई केली असली तरी, सोमवारपासून (१९ मे) या चित्रपटाच्या कमाईचे आकडे खाली घसरू लागले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adipurush contoversy all india cine workers association writes letter to amih shah demanding fir against om raut sva 00