बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा दिग्दर्शक मराठमोळा ओम राऊत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने ओम राऊतही चांगलाच चर्चेत आहे. प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान अशा तगड्या स्टारकास्टबरोबर चित्रपट बनवणारा मराठमोळा ओम राऊत किती शिकला आहे, त्याची कौटुंबीक पार्श्वभूमी काय, याबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘The Kerala Story’ ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड कायम, चौथ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये जन्मलेल्या ओम राऊतचं प्राथमिक शिक्षण बालमोहन विद्यामंदिरातून झालं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ओम राऊत यांनी इंजिनिअरींग करायचं ठरवलं. त्याने मुंबईतीलच शाह अँड अँकर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी घेतली.

‘द केरला स्टोरी’च्या क्रू मेंबरला धमकी, दिग्दर्शकाची मुंबई पोलिसांत धाव

ओम राऊतची आई नीना टेलिव्हिजन निर्मात्या आहेत आणि त्याचे आजोबा डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आणि संपादक होते. याच कारणामुळे ओम राऊतला सुरुवातीपासूनच चित्रपटांमध्ये रस होता आणि त्यासाठी त्याने चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटातील सर्व बारकावे शिकण्यासाठी ओम राऊतने न्यूयॉर्क येथील सिराक्यूज विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्समधून फिल्म्स विषयता पदव्युत्तर पदवी मिळवली.

ओम राऊतने आतापर्यंत ‘लोकमान्य एक युग पुरुष’, ‘तान्हाजी’ व ‘आदिपुरुष’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. १६ जून रोजी त्याचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adipurush director om raut education family background and movie list details hrc
Show comments