सोशल मीडियावर सध्या ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाला जोरदार विरोध होताना दिसत आहे. या चित्रपटावर सातत्याने टीका केली जात आहे. सैफ अली खानचा लूक आणि व्हिएफएक्सची खिल्ली उडवली जात आहे. तसेच काही दृश्यांवरही नेटकऱ्यांनी आक्षेप घेत हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. अशातच आता हॅशटॅग ‘राम सेतू’ ट्रेंड होताना दिसत आहे. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एकीकडे ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ला सातत्याने विरोध होतोय. तर दुसरीकडे अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोन्ही चित्रपट रामायणापासून प्रेरीत आहेत. त्यामुळे आता सोशल मीडियावर दोन्ही चित्रपटांमध्ये तुलना होताना दिसत आहे. ‘राम सेतू’ हा एक अॅक्शन आणि थरारक चित्रपट आहे. तर ‘आदिपुरुष’मध्ये रामायणाचीच कथा दाखवण्यात आली आहे. जेव्हा आदिपुरुषचे दिग्दर्शक ओम राऊत यांना दोन्ही चित्रपटांच्या तुलनेबाबत विचारलं तेव्हा त्याने याबाबत आपलं मत मांडलं.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा- ‘आदिपुरुष’मधील रावणाच्या लूकवरुन होणाऱ्या टीकेला ओम राऊत यांचं चोख उत्तर; म्हणाले “आमचा रावण हा..”

अक्षय कुमारच्या ‘रामसेतू’ चित्रपटाबाबत बोलताना ओम राऊत म्हणाला, “रामायण हा आपला इतिहास आहे. एक रामभक्त या नात्याने मी खूप खूश आहे. कारण ‘राम सेतू’मधून हे समजणार आहे की, जे काही घडलं हे काल्पनिक नाही तर सत्य होतं. युवापिढीला समजणार आहे की, राम सेतू ही फक्त पौराणिक कथा नाही तर आपला इतिहास आहे. मी अक्षय कुमारलाही बोललो होतो की मला याचा अभिमान वाटतो. की तू अशाप्रकारचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. कारण हा चित्रपट आपल्या इतिहासाचे पुरावे देणारा आहे. आपल्याकडे, राम जन्मभूमी, पंचवटी आणि राम सेतू असल्याचा या चित्रपटातून दाखवलं जाणार आहे.”

आणखी वाचा- “संस्कृतीची मोडतोड करणं चुकीचं…” ‘आदिपुरुष’ टीझरवर ‘रामायण’ फेम अरुण गोविल यांनी सोडलं मौन

दरम्यान अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘राम सेतू’ हा चित्रपट येत्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अजय देवगणच्या ‘थँक गॉड’ चित्रपटाची तगडी टक्कर असणार आहे.

Story img Loader